

Mumbai Portuguese History
ESakal
मुंबई : मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या विहार तलावाच्या निळ्याशार पाण्याखाली एक ऐतिहासिक वारसा दडला आहे. तब्बल पावणेचारशे वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या या चर्चचे अवशेष आजही तलावाच्या तळाशी सुप्त अवस्थेत असून, तलावातील पाणी आटल्यास हे अवशेष आजही वर येऊ शकतात, अशी रंजक माहिती समोर आली आहे. 'वॉचडॉग फाउंडेशन'ने प्रसिद्ध केलेल्या एका ऐतिहासिक दस्तऐवजातून या विस्मृतीत गेलेल्या चर्चचा आणि मुंबईच्या जुन्या ख्रिश्चन समुदायाच्या स्थलांतराचा इतिहास उजेडात आला आहे.