
मुंबई : अँटिबाॅडि टेस्टमधूनही आता एखाद्याला कोरोनाची लागण झाली किंवा नाही हे ओळखणे शक्य होणार आहे, अँँबॉट डायग्नोस्टिक कंपनीने तशी घोषणा केली आहे. ही चाचणी विषाणूबाबत अधिक माहिती देण्यासोबतच अँँण्टीबॉडीज शरीरामध्ये किती काळ राहू शकतात आणि ते रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतात की नाही, याबाबतही माहिती देईल. या प्रकारच्या माहितीमुळे उपचार व लसींच्या विकासासाठी मदत होईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.
कोरोना चाचण्यांमध्ये हे एक महत्त्वपुर्ण पाऊल आहे. युरोपियन बनावटीची अँँण्टीबॉडी रक्त तपासणी अँँबॉटच्या प्रयोगशाळा साधनांचा उपयोग करून करण्यात येईल. यासाठी कंपनीच्या काही भागांचे विस्तारीकरण करण्यात येईल, अशी माहितीही कंपनीने दिली आहे. लॉकडाऊनळे आता जरी या चाचणीसाठी आवश्यक सामग्री उपलब्ध होणे जिकिरीचे असले; तरी मे अखरेपर्यंत अँबाॅट शिपिंगची सुरूवात करेल. त्यानंतर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी पुरवठ्यामध्ये वाढ करेल, असे सांगण्यात आले.
चाचण्या लवकरच सुरू करणार!
कोरोनाच्या लढाईत मदत करण्यासाठी अँबाॅट कंपनी लवकरात लवकर बाजारपेठेमध्ये कोविड-19 चाचण्या उपलब्ध करून देण्यावर भर देणार आहे. ही चाचणीदेखील कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी महत्वाची आहे. या चाचण्या लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कंपनीतर्फे प्रयत्न केले जात आहे, अशी माहिती भारतातील अँबॉटच्या डायग्नोस्टिक्स व्यवसायाचे प्रमुख व महाव्यवस्थापक नरेंद्र वर्दे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.