अनागोंदी कारभाराची हद्द ! धारावीतल्या पॉझिटिव्ह कुटुंबाला सोडलं घरी सोडले घरी आणि पुढे जे घडलं...

अनागोंदी कारभाराची हद्द ! धारावीतल्या पॉझिटिव्ह कुटुंबाला सोडलं घरी सोडले घरी आणि पुढे जे घडलं...

मुंबई : धारावीतील संक्रमण शिबिरातील क्वारंटाईन सेंटरमधील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका कुटुंबातील सहा जणांना पंधरा दिवसानंतर घरी सोडण्यात आले; मात्र त्यांना त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवालच देण्यात आला नाही. तब्बल पाच दिवस क्वारंटाईन सेंटरला चकरा मारल्यानंतर कुटुंब प्रमुखाला सर्वांचे अहवाल मिळाले; मात्र त्यात चार जण कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. कारण तोपर्यंत हे चारही जण धारावीत सार्वजनिक शौचालयासह इतर ठिकाणी वावरत होते. ही बाब लक्षात येताच पालिकेने त्यांना पुन्हा उपचारासाठी धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये दाखल केले. त्यामुळे या कुटुंबाला मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.

धारावीत राहणाऱ्या आणि एका नामांकित रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे त्यांच्या वरच्याच माळ्यावर राहणाऱ्या भावाने कुटुंबातील सहा जणांची तपासणी करण्याची विनवणी पालिका कर्मचाऱ्यांकडे केली. पण आरोग्य कर्मचारी लक्ष देत नसल्याने अखेर ते स्वतः पत्नी आणि चार मुलांसह धारावी क्वारंटाईन सेंटरमध्ये 29 एप्रिल रोजी दाखल झाले. त्यांचे 7 मे रोजी कोरोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. 8 मे रोजी या सर्वांचे रिपोर्ट प्रयोगशाळेतून जारी झाले. यामध्ये चार जणांना कोरोनाची बाधा झाली. तर दोघांचे नमुने निगेटिव्ह आले. हे रिपोर्ट क्वारंटाईन सेंटरने न देताच त्यांना 11 एप्रिल रोजी घरी जाण्यास सांगितले.

क्वारंटाईन सेंटर मध्ये असे प्रकार होत नाहीत. असा काही प्रकार आहे काय, याची माहिती घेतो. - किरण दिघावकर, महापालिका सहायक आयुक्त, जी / उत्तर

या कुटुंबाने रिपोर्टबाबत माहिती विचारली असता निगेटिव्ह रिपोर्ट सेंटरकडे येत नसल्याचे कारण देऊन त्यांना घरी जाण्यास भाग पाडले. या कुटुंबाकडे आजूबाजूचे लोक रिपोर्टबाबत विचारणा करू लागले. त्यामुळे कुटुंबप्रमुखाने पाच दिवस सेंटसरला जाऊन रिपोर्ट देण्याची मागणी केली. सेंटरवरील अधिकारी दाद देत नसल्याने अखेर मित्राच्या मदतीने त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्वांचा रिपोर्ट मेलवर मिळवला. रिपोर्ट पाहताच या कुटुंबाला धक्काच बसला. गेले चार दिवस सर्वजण सार्वजनिक शौचालयासह इतर ठिकाणी वावरत होते. पण चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येताच त्यांना पुन्हा घेऊन जाण्यास पालिका अधिकारी गाडीसह दारी दाखल झाले. त्यामुळे कुटुंबासह त्यांच्या आजूबाजूस राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालिकेमुळे महिनाभराची शिक्षा

पालिकेने या कुटुंबातील चार बाधितांना आता धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे निरीक्षणासाठी ठेवले आहे. क्वारंटाईन सेंटरमधील 14 दिवस मनस्ताप सहन केल्यानंतर पुन्हा या कुटुंबाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आमच्यावर आर्थिक संकट आले असतानाच पालिकेचे कारभारामुळे आम्हाला महिनाभराची शिक्षा मिळाली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया कुटुंबप्रमुखाने व्यक्त केली आहे. 

स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये असुविधा

धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये दाखल असलेल्या लोकांना क्वारंटाईन सेंटरप्रमाणे दूध, अंडी मिळत नाहीत, असा आरोप येथील रुग्णांनी केला आहे. येथे  जेवण निकृष्ट दर्जाचे मिळते तर कपडे धुण्यासाठी, हात धुण्यासाठी साबणही नाही.  लहान मुलांना बिस्कीट मिळत नसल्याने स्वतःच्या खर्चाने ते विकत आणायला लागत असल्याचा आरोप येथील रुग्णांनी केला आहे.

positive family discharged by doctors horrible indecent happened in dharavi  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com