मोठी बातमी - हॉटेल, मॉल्स, दुकानं, लोकल ट्रेन सुरु होणार पण...

काय निर्णय होणार?
Lockdown
LockdownEsakal

मुंबई: मागच्या दीड महिन्यांपासून महाराष्ट्र लॉकडाउनमध्ये आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा लॉकडाउन करण्यात आला होता. आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे राज्य टप्प्याने अनलॉक करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेळी पॉझिटिव्हिटी रेट ध्यानात घेऊन राज्यातील जिल्हे अनलॉक करण्यात येणार आहेत. (Possibilty of more relaxation in Lockdown restrictions)

पहिल्या लेव्हलमध्ये बगीचा, वॉकिंग सायकलिंग ट्रॅक खुले होतील. खासगी कार्यालय आणि सरकारी कार्यालयात १०० टक्के उपस्थितीला मुभा राहील. थिएटर सुद्धा सुरु होतील. पहिल्या आणि दुसऱ्या लेव्हलमध्ये शूटिंगला सुद्धा परवानगी दिली आहे.

Lockdown
मुंबईत पुढच्या आठवड्यात सुरु होऊ शकते लोकल सेवा

पहिल्या लेव्हलमध्ये पाच टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्के ऑक्सिजन बेडसचा समावेश आहे. तिथे सर्व अनलॉक होईल.

पहिल्या लेव्हलमध्ये १८ जिल्हे आहेत ( औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम,)

दुसऱ्या लेव्हलमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्क्यांदरम्यान ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल,

दुसऱ्या लेव्हलमध्ये पाच जिल्हे आहेत (अहमदनगर, अमरातवती, हिंगोली, मुंबई शहर आणि उपनगर, नंदुरबार)

तिसऱ्या लेव्हलमध्ये पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के आणि ऑक्सिजन बेड्सची ऑक्युपंसी ३० टक्के.

तिसऱ्या लेव्हलमध्ये १० जिल्हे आहेत. (अकोला, बीड, कोल्हापूर, उस्माबादा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, हे यामध्ये आहेत.)

चौथ्या लेव्हलमध्ये १० ते २० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ६० टक्क्याच्यावर ऑक्सिजन बेड्स ऑक्युपंसी.

चौथ्या लेव्हलमध्ये दोन जिल्हे आहेत. (पुणे, रायगड)

पाचव्या लेव्हलमध्ये पॉझिटिव्हिटि रेट २० टक्क्याच्यावर आणि ऑक्सिजन बेड्स ऑक्युपंसी ७५ टक्के. (रेड झोन कायम राहणार आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com