esakal | कोरोना रूग्णांना मल्टी सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमची लक्षणे, मुंबईत आढळला पहिला रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना रूग्णांना मल्टी सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमची लक्षणे, मुंबईत आढळला पहिला रुग्ण

पोस्ट कोविड रूग्णांमध्ये मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम यांसारखी गंभीर लक्षणे आता दिसू लागली आहेत.

कोरोना रूग्णांना मल्टी सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमची लक्षणे, मुंबईत आढळला पहिला रुग्ण

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : पोस्ट कोविड रूग्णांमध्ये मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम यांसारखी गंभीर लक्षणे आता दिसू लागली आहेत. यामध्ये ह्रदय, फुफ्फुस, यकृत, मुत्रपिंड, रक्तवाहिन्या अशा वेगवेगळल्या अवयवांमध्ये जळजळ होते. या लक्षणांवर वेळीच उपचार करणे महत्वाचे असून दुर्लक्ष केल्यास रूग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.   

मुंबईत मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमची पहिली घटना समोर आली असून एका 52 वर्षीय महिलेला अशी लक्षणे जाणवली आहेत. या महिवेवर अंधेरीच्या कोकिलाबेन रूग्णालयात दाखल कऱण्यात आले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. प्रौढ व्यक्तीमध्ये अशी लक्षणे पहिल्यांदाच आढळळी आहेत.

महत्त्वाची बातमी : रहिवाशांना दिलासा, उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करताना 1 वर्षाचे भाडे आगाऊ जमा करण्यासाठी एस्क्रो खातं उघडणे बंधनकारक

प्रौढांमद्ये कोरोना विषाणुंशी निगडीत एक गुंतागुंत आढळली आहे. या आजाराला मल्टी सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम म्हणतात. या आधी ही लक्षणे केवळ मुलांमध्ये दिसत होती. या सिंड्रोममध्ये हृदय, यकृत, मुत्रपिंड, रक्तवाहिन्या इत्यादींमध्ये अवयव आणि उती याला सूज येऊ शकते. याआधीही मुंबईत कोरोना विषाणुंची लागण झालेल्या तरूण रूग्णांमध्ये कावासाकी रोगासारखीच लक्षणे आढळली आहेत. पुर्वी लहान मुलांमध्ये ही अशीच लक्षणं पाहिली गेली होती. 

जगभरात कोरोना विषाणु मानवी शरिरावर कसा परिणाम करत आहे याची तपासणी करण्यासाठी डॉक्टर, संशोधक आणि वैज्ञानिक सतत प्रयत्न करत आहेत. कोरोना आजारातून बरे जालेल्या रूग्णांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून त्यांना जाणवणाऱ्या लक्षणांची नोंद ठेवण्यात येत आहे. अशा लक्षणांची गंभीर दखल घेऊन गरजेचे आहे. ही लक्षणे जितकी गंभीर होतील तितका आजारपणाचा कालावधी वाढण्याची शक्यता असते.     
पोस्ट कोविड रूग्णांना शारिरीक थकवा, चव-गंध कमी होणे यांसह इतर गंभीर परिणाम देखील होत असल्याचे दिसले.

मात्र कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना मल्टी सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम यांसारखी गंभीर लक्षणे आता दिसू लागली असल्याचे अंधेरीच्या कोकिलाबेल धिरूबाई अंबानी रूगालयाच्या पिडीयाट्रीक्स तसेच संसर्गजन्य आजार विभागाच्या कन्सल्टंट डॉ. तनू सिंघल यांनी सांगितले.

महत्त्वाची बातमी फेक टीआरपी प्रकरण: 'फक्त मराठी' चॅनलच्या मालकाला जामीन मंजूर

यामध्ये ह्रदय, फुफ्फुस, यकृत, मुत्रपिंड , रक्तवाहिन्या अशा वेगवेगळल्या अवयवांमध्ये जळजळ होते. ही लक्षणे लहान मुलांमध्ये आढळत होती. या लक्षणांना एमआयएम सी असे संबोधले जाते. मात्र आता ही लक्षणे प्रौढ व्यक्तीमध्येही दिसायला लागली असल्याचेही त्या पुढे म्हणाल्या. यामुळे रूग्णाच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. ही लक्षणे जीवघेणी देखील ठरू शकतात. यामुळे अशी लक्षणे जाणवणा-या रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी लवकर निदान होणे महत्वाचे असल्याचेही त्या पुढे म्हणाल्या.

( संपादन - सुमित बागुल )

post corona issues first patient with multi system inflammatory issues detected in mumbai