esakal | भाजपचे 'सेल्फी विथ खड्डा' आंदोलन; पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप | BJP Strike
sakal

बोलून बातमी शोधा

bjp strike

भाजपचे 'सेल्फी विथ खड्डा' आंदोलन; पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा वाद (potholes on road) आता चांगलाच चिघळला आहे. भाजपने (bjp strike) आज मुंबईतील विविध ठिकाणी सेल्फी विथ खड्डा आंदोलन केले. तर, अंधेरी एमआयडीसी (Andheri midc) येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी लाठी मार केल्याचा (police action) आरोप भाजपने केला आहे. त्याचबरोबर भाजपने काही भागात खड्ड्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही भरवले.

हेही वाचा: शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा करा - डॉ. नितीन राऊत

महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोरील रस्त्यासह आज मुंबईत विविध ठिकाणी भाजपने 'सेल्फी विथ खड्डा' आंदोलन केले. अंधेरी येथे झालेल्या आंदोलनाच्यावेळी पोलिसांनी लाठी हल्ला केला. त्यात काही कार्यकर्ते जखमी झाले झाले असून त्यांचे कपडेही फाडले आहेत. असा आरोप भाजपने केला. महानगरपालिका मुख्यालयासमोर माजी मंत्री आशिष शेलार, माजी आमदार राज पुरोहीत, नगरसेवक आकाश पुरोहीत यांच्या उपस्थीतीत आंदोलन झाले. खड्ड्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्याची वेळ येणेचे वाईट आहे. पण, ही मुंबईची परिस्थिती असल्याचे दाखवावे लागले.असा टोला शेलार यांनी लगावला.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 405 नव्या रुग्णांची भर; तर 6 जणांचा मृत्यू

मंत्रालयात लाठ्या काठ्या घेऊन आंदोलन करायचे

भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठी हल्ला केल्याचा आरोप करत अहिंसेच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन पोलिसांकडून चिरडणार असाल तर यापुढे मंत्रालयात लाठ्याकाठ्या घेऊन आंदोलने करायची का असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थीत केला. असे प्रकार ठाकरे सरकारने थांबवावेत असा इशारही त्यांनी दिला.

आंदोलनाचे स्वागत पण..

खड्डे दुरुस्त झालेच पाहिजे. आता पावसानेही उघडीप दिली आहे. त्यामुळे ते काम सुरुच आहे. विरोधकांच्या आंदोलनाचे स्वागत आहे.ते ज्या ठिकाणी सेल्फी काढतील ते खड्डे युध्द पातळीवर दुरुस्त केले जातील. पण, अशी आंदोलने करताना कोविडचे भान ठेवावे. अद्याप कोविडचा धोका संपलेला नाही. त्यामुळे ती खबरबदारीही घेणे आवश्‍यक आहे.असा चिमटा महापौर किशोरी पेडणेकर यांनी काढला.

loading image
go to top