esakal | BMC : खड्डे दुरुस्तीला वेग; दिवसाला 1 हजार ते 1200 खड्ड्यांची दुरुस्ती | Potholes
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

BMC : खड्डे दुरुस्तीला वेग; दिवसाला 1 हजार ते 1200 खड्ड्यांची दुरुस्ती

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : खड्डे दुरुस्तीला (potholes repairing) आता वेग आला आला आहे. दिवसाला 1 हजार ते 1200 खड्ड्यांची दुरुस्ती महानगरपालिका (BMC) करत आहे. मुंबईत (mumbai) आतापर्यंत 25 हजारहून अधिक खड्ड्यांची दुरुस्ती झाली असून या सर्व खड्ड्यांचे मिळून 2 लाख चौरस मिटरहून अधिक क्षेत्रफळ होते. म्हणजे साधारण क्रिकेटच्या 13 स्टेडीअम एवढ्या खड्ड्यांची दुरुस्ती झाली आहे.

हेही वाचा: उत्तराखंड हिमस्खलन दुर्घटना; मुंबईकरांचे मृतदेह सापडले

खड्ड्यांवरून राज्यातील प्रत्येक शहरात आता राजकरण पेटू लागले आहे. महानगरपालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी सर्व खड्डे युध्द पातळीवर दुरुस्त करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.त्यानुसार पालिका कामाला लागली आहे.सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी एका दिवसात 1200 खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली.अशी माहिती महानगर पालिकेच्या रस्ते विभागाकडून उपलब्ध झाली आहे.

महानगरपालिकेने 9 एप्रिल पासून आता पर्यंत 45 हजार 929 खड्डे दुरुस्त केले आहेत.त्यासाठी 3 हजार 44 मेट्रीक टन डांबर वापरण्यात आले आहे.मुंबईत आता पर्यंत दुरुस्त केलेल्या खड्‌डे एकत्र केल्यास त्याचे क्षेत्रफळ 2 लाख 14 लाख हजार चौरस मिटरहून अधिक होते.क्रिकेटचे 13 स्टेडीअम भरतील एवढ्या क्षेत्रफळाच्या खड्ड्यांची दुरुस्ती आता पर्यंत झाली आहे.

वॉर्ड टिमचा वॉच

पालिका आयुक्तांनी आदेशानंतर पालिका झपाटून कामाला लागली आहे.रस्ते अभियंत्यांवर सोपवलेली इतर कामे बाजूला सारुन त्यांच्यावर आता फक्त खड्ड्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.प्रत्येक प्रभागाची टिम खड्ड्यांवर तसेच दुरुस्तीच्या कामाला लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले.

भांडूप कुर्ला खड्ड्या

भांडूप आणि कुर्ला परिसरात सर्वाधिक खड्डे दुरुस्त करण्यात आले आहे. भांडूप मध्ये तब्बल 3 हजार 882 खड्डे दुरुस्त करण्यात आले आहेत.तर,मालाड मध्ये 3 हजार 63 खड्ड्यांची दुरुस्ती झाली आहे.त्या खालोखल वांद्रे,खार पश्‍चिम 2 हजार 828,अंधेरी जोगेश्‍वरी पश्‍चिम 2 हजार 766,अंधेरी जोगेश्‍वरी पुर्व 2 हजार 284 आणि कुर्ला परीसरात 2 हजार 326 खड्ड्यांची दुरुस्ती झाली आहे. मध्ये चेंबूर परीसरात 2 हजार 37 खड्ड्यांची नोंद झाली आहे.

loading image
go to top