esakal | खराब रस्त्यांमुळे अपघात झाला तर चालक दोषी नाही - न्यायालय
sakal

बोलून बातमी शोधा

court

खराब रस्त्यांमुळे अपघात झाला तर चालक दोषी नाही - न्यायालय

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : खराब रस्त्यांमुळे (potholes road) अपघात (Accident) झाल्याची शक्यता नाकारता येत नसून यामध्ये वाहनचालकाची (Driver) चूक आढळत नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवून बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाने (Borivali Court) एका रिक्षाचालकाला (Rikshaw Driver) अपघाताच्या आरोपातून दोषमुक्त (Exonerated) केले आहे.

सन 2010 मध्ये गोरेगाव पूर्वमध्ये घडलेल्या अपघातात एका महिलेचा म्रुत्यु झाला होता. रिक्षा चालक सूरज जैयस्वालने रिक्षा सुसाट चालविली आणि त्यामुळे अपघात झाला, असा गुन्हा यामध्ये पोलिसांनी नोंदविला होता. यावर महानगर दंडाधिकारी ए पी खानोरकर यांच्यापुढे सुनावणी झाली. अपघात स्थळावरील रस्त्याची अवस्था वाईट होती हे उपलब्ध साक्षी पुराव्यांवरून सिध्द होत आहे. अशा रस्त्यावर वाहनचालक गाडी योग्य प्रकारे आणि सहजपणे चालवू शकत नाही. अशा खराब रस्त्यांमुळे अपघात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यामध्ये रिक्षाचालकाची चूक वाटत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

पश्चिम उपनगरातील नसीम बगदादी या आपल्या दोन मुलींसह आरोपीच्या रिक्षातून 7 जून, 2010 मध्ये प्रवास करीत होत्या. त्यांना मीरा रोडला नातेवाईकांकडे जायचे होते. रिक्षाचालकाने बेदरकारपणे रिक्षा चालविली ज्यामुळे रिक्षावरील नियंत्रण ओ पी लेक परिसरात सुटले आणि रिक्षा उलटली आणि एका खांबाला धडकली. रिक्षातील तिघांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण घटनास्थळावरून रिक्षाचालक निघून गेला. रुग्णालयात महिलेचा म्रुत्यु झाल्यावर पोलिसांनी सदोष हत्येचा गुन्हा आरोपीवर लावला. खटल्यात आरोपीने सर्व आरोप नाकारले होते.

हेही वाचा: मानाच्या श्रीफळालाही दरवाढीचा फटका; १० ते २० टक्‍के वाढ

खटल्याच्या सुनावणीमध्ये, तेथील रस्ता खराब होता आणि अशा रस्त्यावर वाहनचालकांच्या चुकिशिवाय अपघात होत असतात. त्यामुळे या अपघातासाठी वाहनचालकाला दोषी ठरविता येणार नाही, असा युक्तिवाद आरोपीकडून एड संदीप पाटील यांनी केला. पिडीत मुलीनेही रस्ता खराब असल्याचे साक्षीमध्ये मान्य केले होते. तसेच पोलिसांनी आरोपीवर सुसाट रिक्षा चालवल्याचा आरोप केला होता. मात्र मुलींनी याचा उल्लेख साक्षीमध्ये केला नाही, त्यामुळे या दाव्याबाबत संशय निर्माण होतो, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

loading image
go to top