esakal | महिला सबलीकरणासाठी 'वूमन कनेक्ट चॅलेंज'
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

महिला सबलीकरणासाठी 'वूमन कनेक्ट चॅलेंज'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रिलायन्स फाऊंडेशन आणि यु. एस. एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या 'वूमन कनेक्ट चॅलेंज इंडिया'साठी दहा संघटनांची अनुदानाकरिता निवड करण्यात आली आहे. लिंगभेद दूर करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यात येणार आहे.

हेही वाचा: 'रिलायन्स'च्या निकृष्ट कामाचा शेतकऱ्यांना फटका; शेतीची मोठी हानी

रिलायन्स फाऊंडेशनने या उपक्रमासाठी साडेआठ कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. याचा फायदा १७ राज्यांतील तीन लाखांहून अधिक महिलांना होईल. दहा अनुदान प्राप्त संस्थांमध्ये अनुदीप फाऊंडेशन, बेअरफूट कॉलेज इंटरनॅशनल, सेंटर फॉर युथ अँड सोशल डेव्हलपमेंट, फ्रेंड्स ऑ विमेन्स वर्ल्ड बँकिंग, नांदी फाऊंडेशन, प्रोफेशनल असिस्टन्स फॉर डेव्हलपमेंट अॅक्शन, सोसायटी फॉर डेव्हलपमेंट अल्टरनेटीव्हज, सॉलीडरीदाद रिजनल एक्स्पर्टीज सेंटर, टीएनएस इंडिया फाऊंडेशन आणि झेडएमक्यू डेव्हलपमेंटचा समावेश आहे. या संस्थांना प्रत्येकी ७५ लाख ते १ कोटी रुपये अनुदान मिळेल.

loading image
go to top