
मध्य रेल्वे मार्गावर आज पॉवर ब्लॉक; अनेक लोकल ट्रेन रद्द!
मुंबई : मध्य रेल्वेने बदलापूर स्थानकावर ओव्हर ब्रिजचे गर्डर्स टाकण्यासाठी अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक सकाळी १०.५० ते दुपारी ०१.१० पर्यंत असणार आहे. त्यामुळे अनेक लोकल रद्द असणार आहेत. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डायव्हर्जन करण्यात आले आहे.
या ब्लॉक कालावधीत कल्याण येथून सकाळी १०.१३ ते दुपारी १.२६ पर्यंत अंबरनाथ/बदलापूर/कर्जतकडे जाणाऱ्या डाऊन लोकल आणि बदलापूर येथून सकाळी १०.२६ ते दुपारी १.२२ पर्यंत सुटणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील उपनगरी ट्रेन रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर, ट्रेन क्रमांक १७०३२ हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि ट्रेन क्रमांक ११०१४ कोईम्बतूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस हि कर्जत - पनवेल - दिवा मार्गे वळवण्यात येईल. कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी या गाड्यांना दिवा येथे दुहेरी थांबा दिला जाईल आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिरा पोहोचतील.
Web Title: Power Block Today Central Railway Line Many Local Trains Will Canceled Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..