esakal | खंडित विजेचा विद्यार्थ्यांना धक्का; 10 समूह महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या 
sakal

बोलून बातमी शोधा

खंडित विजेचा विद्यार्थ्यांना धक्का; 10 समूह महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या 

मुंबई महानगर क्षेत्रात सकाळी खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा परिणाम महाविद्यालयीन परीक्षांवरही झाला.

खंडित विजेचा विद्यार्थ्यांना धक्का; 10 समूह महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या 

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात सकाळी खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा परिणाम महाविद्यालयीन परीक्षांवरही झाला. मुंबई विद्यापीठाशी संलग्न काही समूह महाविद्यालयांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. मात्र, काही समूह महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांच्या 42 पैकी 32 समूहांमध्ये परीक्षा सुरळीत पार पडल्या. 32 क्‍लस्टरमधील 5 क्‍लस्टर्सच्या अंशतः काही महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 10 समूह महाविद्यालयांनी त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे नियोजन त्या-त्या महाविद्यालयांमार्फत करण्यात येणार आहे. 

मुंबईचं फुप्फुस वाचल्याचा आनंद! कांजूर कारशेडच्या निर्णयाचे पर्यावरणवाद्यांकडून स्वागत

विद्यापीठाने अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालयाचे समूह केले आहेत. सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांना वीज बिघाडाचा फटका बसला. सोमवारी 32 समूह महाविद्यालयांतील 19 हजार 279 पैकी 18 हजार 950 विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा दिली. या 32 क्‍लस्टरमधील 5 क्‍लस्टर्सच्या अंशतः काही महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. काही महाविद्यालयांच्या परीक्षा संपलेल्या आहेत. 
शिक्षणशास्त्राच्या 10 समूहांतील दोन महाविद्यालये वगळता इतरांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. त्यामध्ये 2018 पैकी 2007 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. स्पेशल एज्युकेशन, फिजिकल एज्युकेशन आणि सोशल वर्क समूहांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. विधी समूहातील 9 क्‍लस्टरमधील 7 महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून उर्वरित 505 पैकी 504 विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत झाली, असे मुंबई विद्यापीठाचे उप-कुलसचिव डॉ. लीलाधर बन्सोड यांनी सांगितले. 

इलेक्‍ट्रॉनिक मीडियावर अंकुश का नाही? उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

फार्मसीच्या परीक्षा 15 ऑक्‍टोबरला 
विद्यापीठ विभागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. एकूण 582 विद्यार्थ्यांपैकी 561 विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा दिली. अभियांत्रिकी आणि एमसीएच्या एकूण 10 समूहांतील सोमवारच्या नियोजित बॅकलॉगच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा 14 ऑक्‍टोबर 2020 रोजी होतील. फार्मसीच्या तीनही समूहांतील आजच्या नियोजित परीक्षा आता 15 ऑक्‍टोबरला होणार आहेत. 

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image