Mumbai News : प्रशासकांची सल्लामसलत ! प्रशासकांच्या अधिकारांवर मर्यादा आणावी; अनिल परब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 powers of rulers should be limited Anil Parab bmc mumbai budget

प्रशासकांची सल्लामसलत ! प्रशासकांच्या अधिकारांवर मर्यादा आणावी; अनिल परब

मुंबई : महानगरपालिकेवर प्रशासक अस्तित्वात असल्यानेच लोक प्रतिनिधी सभागृहात येईपर्यंत महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हंगामी मांडण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. प्रशासकांकडून अर्थसंकल्प मांडताना नियमित प्रक्रिया पार पडत नसल्याने शिवसेना नेते अनिल परब यांनी प्रशासकांच्या अधिकारांवर मर्यादा आणण्याची मागणी केली होती.

शिवसेनेने केलेल्या सूचनेमुळे प्रशासकांना हंगामी की पूर्ण अर्थसंकल्प मांडता ? याबाबतचा सल्ला घेण्यासाठी विद्यमान प्रशासक आणि महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याआधीचे प्रशासक असलेल्या जे जी कांगा यांची नुकतीच भेट घेतली. कांगा हे १९८४ ते १९८५ या कालावधीत प्रशासक म्हणून काम पाहताना पूर्ण अर्थसंकल्प मांडला होता.

हा सल्ला वेळीच मिळाल्याने चहल यांच्यासमोरील अर्थसंकल्प मांडण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आजचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी प्रशासक असलेल्या चहल यांना सादर केला. निवडणुकांनंतर नगरसेवक अस्तित्वात आल्यानंतर त्यांनाही अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये बदल करण्याचे अधिकार असतील असे सांगत, चहल यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.