esakal | Mumbai: पश्चिम रेल्वेद्वारे पादचारी पूल उभारणीसाठी भर
sakal

बोलून बातमी शोधा

railway bridge

Mumbai: पश्चिम रेल्वेद्वारे पादचारी पूल उभारणीसाठी भर

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : प्रभादेवी स्थानकावर (Prabhadevi station) झालेल्या चेंगराचेंगरीचा धसका घेत रेल्वे प्रशासनाने (railway authorities) प्रवाशांच्या सुविधेसाठी (commuters facilities) वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. यात रेल्वे रूळ ओलांडून (track crossing) प्रवाशांचा जीव जाऊ नये (commuters safety) यासाठी पादचारी पूल उभारणीला भर दिली आहे. यासह रेल्वे परिसरातील कमकुवत असलेल्या पुलाची पुनर्बांधणी (bridge reconstruction) करण्यात येत आहे. यामध्ये नुकताच सांताक्रुझ येथे 46 मीटर लांबीचा आणि 6 मीटर रुंदीचा नवीन पादचारी पूल उभारण्यात आला आहे.

हेही वाचा: मुंबईत सक्रिय रुग्णांचा आलेख चढाच!

पश्चिम रेल्वेने कोरोना काळात लाॅकडाऊनमध्ये विविध पायाभूत कामे हाती घेतली. त्यामुळे वाढत्या प्रवाशांनाच्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी पादचारी पूल बांधले जात आहेत. मुंबई रेल्वे विकास काॅर्पोरेशन (एमआरव्हीसी) द्वारे सांताक्रुझ येथे पादचारी पुलाची उभारणी केली. या नवीन पादचारी पुलाच्या पूर्व दिशेकडे एफओबी आणि पश्चिम दिशेकडे स्काॅयवाॅक असून फलाट क्रमांक 3/4 ( डाऊन आणि अप धीमी मार्गिका) यांना हा नवा पादचारी पूल जोडला गेला आहे.

रेल्वे प्रवासी वेळेची बचत करण्यासाठी शाॅर्टकटचा वापर करतात. यासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडतात. त्यामुळे अनेकदा अपघात प्रवाशांचा जीव जातो किंवा गंभीर जखमी होतात. प्रवाशांचे अपघात रोखण्यसाठी पश्चिम रेल्वे आणि एमआरव्हीसीद्वारे पादचारी पूल उभारले जात आहेत. पश्चिम रेल्वेने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये मुंबई उपनगरीय मार्गावर प्रवाशांसाठी आतापर्यंत तीन पूल उभारले आहेत. यात वांद्रे, खार रोड आणि आता सांताक्रुझ येथे पादचारी पूल उभारले आहेत.

लाॅकडाऊन काळात पायाभूत कामे करणे कठिण झाले आहे. मात्र, या परिस्थितीवर मात करून प्रवाशांचा प्रवास सुखरूप आणि सुरक्षित होण्यासाठी प्राधान्य देत आहोत. यासह इतर पादचारी पूल आणि आरओबी यांचे काम सुरू आहे. रेल्वे रूळ ओलांडण्याच्या समस्येला दूर करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.

loading image
go to top