esakal | दोन्ही विमानतळांचं मुख्यालय मुंबईतच राहणार; अदाणींकडून अफवांचं खंडन
sakal

बोलून बातमी शोधा

Navi Mumbai Airport

दोन्ही विमानतळांचं मुख्यालय मुंबईतच राहणार; अदाणींकडून अफवांचं खंडन

sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई : मुंबई तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांचे (Navi Mumbai Airport) मुख्यालय मुंबईतच (Mumbai) राहणार असल्याचा निःसंदिग्ध खुलासा अदाणी समूहाकडून (Adani Group) आज करण्यात आला आहे. यासंदर्भात पसरलेल्या अफवांचे अदाणीकडून खंडन करण्यात आले आहे. देशातील अदाणीच्या ताब्यातील विमानतळांचे (Airport) संचालन करणाऱ्या अदाणी एअरपोर्ट होल्डिंग लि. या कंपनीचे मुख्यालय मात्र अहमदाबादला (Ahmadabad) नेले जाणार असल्याचेही कंपनीने दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे. त्याचमुळे आज या अफवा पसरल्या होत्या. ( Navi Mumbai Airport Headquarter will be in Mumbai only says Adani Group-nss91)

हेही वाचा: पालघर ZP निवडणूक: अध्यक्षपदी वैदही वाढाण, आघाडीचे मंत्री तळ ठोकून

यासंदर्भात विविध प्रसारमाध्यमांमध्ये (सकाळ नव्हे) आलेल्या चुकीच्या बातम्या व त्यामुळे पसरलेल्या अफवा यामुळे अदाणीतर्फे संध्याकाळी ट्वीट करून हे स्पष्टीकरण देण्यात आले. अदाणीने या दोनही विमानतळांच्या व्यवस्थापनांचा ताबा नुकताच मिळवला आहे. या विमानतळांमार्फत सर्वांना अभिमान वाटेल असे मुंबई शहर घडविण्याचा तसेच हजारो रोजगार निर्मित करण्याचा आमचा निर्धार कायम आहे, असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे. या दोनही विमानतळांचे मुख्यालय यापुढेही मुंबईतच राहील. मात्र अदाणी एअरपोर्ट होल्डिंग लि. चे मुख्यालय अहमदाबाद ला नेण्याचा निर्णय कायम आहे, असेही अदाणी च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

loading image