Vasai Virar : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रथमच महिलेला स्थान, वसई विरार जिल्हाध्यक्षपदी प्रज्ञा पाटील यांची निवड
BJP Women Wing : विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीविरोधात ठाम भूमिका घेतलेल्या प्रज्ञा पाटील यांची भाजप वसई विरार जिल्हाध्यक्षपदी प्रथमच महिला म्हणून निवड झाली.
Pragya Patil Elevated to BJP District PresidentSakal
विरार : विधानसभा निवडणुकीच्या वेळेला बहुजन विकास आघाडीच्या विरोधात ठाम पणे लढलेल्या भाजपच्या प्रज्ञा पाटील याना त्याचे बक्षीस मिळाले असून, वसई विरार जिल्हाध्यक्षपदी प्रथमच एक महिलेची निवड झाल्याने खर्या कार्यकर्त्याचा सन्मान झाल्याचे बोलले जात आहे.