
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष न्यायालयाने 17 वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी न्यायालयाबाहेर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, या प्रकरणामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य अपमानाने भरलेले होते. "मी संन्यास घेऊन आयुष्य जगले, पण माझ्यावरून भगव्या रंगाला कलंकित करण्याचा प्रयत्न झाला. समाजात मला वाईट नजरेने पाहिले गेले, अपमानित केले गेले," असे त्या रडत रडत म्हणाल्या. या निकालामुळे त्यांना प्रथमच आनंदाची अनुभूती झाली आहे.