esakal | महावितरणची भरती प्रक्रिया पारदर्शक; प्राजक्त तनपुरे यांची माहिती | Prajakt tanpure
sakal

बोलून बातमी शोधा

Prajakt Tanpure

महावितरणची भरती प्रक्रिया पारदर्शक; प्राजक्त तनपुरे यांची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तेसेवा

मुंबई : महावितरणची (MSEB) विद्युत सहायकपद भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज (wrong application) भरला असेल, त्यांना नियमानुसार अपात्र घोषित (ineligible candidate) करण्यात येईल, कोणत्याही उमेदवारांवर अन्याय होणार नाही, असे मत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (prajakt tanpure) यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: नवी मुंबई : ऑक्टोबर हिटचा तडाखा; बदलत्‍या हवामानाचा परिणाम

फोर्ट येथील महावितरणच्या कार्यालयात निवडक विद्युत सहायक उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सोमवारी (ता. ४) बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी उमेदवारांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्त्तरे देऊन तनपुरे यांनी उमेदवारांचे समाधान केले. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहायकपदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालाबाबत समाजमाध्यमातून गैरसमज पसरवण्यात येत होते. याबाबत उमेदवारांशी थेट चर्चा करून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले आहे. निकालात कोणत्याही प्रकारची चूक झाली नसल्याचे तनपुरे यांनी स्पष्ट केले.

"सर्व निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक होत आहे. कोणीही कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये."
- प्राजक्त तनपुरे, ऊर्जा राज्यमंत्री

loading image
go to top