Aarey Carshed : आरे कारशेड विरोधात प्रकाश आंबेडकरांचा इशारा; 'वंचित' उतरणार रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Ambedkar latest news

आरे कारशेड विरोधात प्रकाश आंबेडकरांचा इशारा; 'वंचित' उतरणार रस्त्यावर

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आरे कारशेडचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सरकारनं कारशेडवरील बंदीचा निर्णय मागे घेतल्यानंतर पर्यावरणवादी पुन्हा एकदा खवळले आहेत. सुप्रीम कोर्टातही याबाबत नवी याचिका दाखल झाली आहे. यापार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीने देखील यामध्ये उडी घेतली आहे. वंचितचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार, येत्या रविवारी ७ ऑगस्ट रोजी वंचितकडून आंदोलन करण्यात येणार आहे. (Prakash Ambedkar warning against Aarey Carshed VBA will get protest)

हेही वाचा: "हा तर रामभक्तांचा अपमान"; काँग्रेसच्या आंदोलनावर भडकले योगी आदित्यनाथ

याबाबत माहिती देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरेचं जंगल हे मुंबईच्या ऑक्सिजनचा मोठा स्त्रोत आहे, पण सरकारनं इथंच मेट्रोशेडचा घाट घातला आहे. त्याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं रविवारी ७ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहनही आंबेडकर यांनी केलं आहे.

सुप्रीम कोर्टात १० ऑगस्टला सुनावणी

आरे कारशेडवरील बंदी उठवल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एकही झाड तोडलं जाणार नाही, जी झाडं तोडावी लागणार होती ती यापूर्वीच तोडण्यात आली आहे. पण ज्यावेळी कारशेडवरील बंदी उठवली त्याच्या दुसऱ्याच दिवशी इथं झाडतोड झाल्याचं समोर आलं, त्यानंतर पर्यावरण प्रेमी पुन्हा एकदा आक्रमक झाले तसेच त्यांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

Web Title: Prakash Ambedkar Warning Against Aarey Carshed Vba Will Get Protest

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..