संक्रमण शिबिराच्या घुसखोरी प्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा - प्रसाद लाड

प्रसाद लाड यांचे गृहनिर्माण मंत्र्यांना आव्हान
prasad lad
prasad ladsakal media

मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हाडा (Mhada) संक्रमण शिबिरातील घुसखोरीच्या मुद्द्यावर ट्विटरबाजी (Twitter) करण्यापेक्षा दोषी अधिकाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल (Police FIR) करावा. ट्विट करून केवळ तत्वज्ञान पाजळू नये, आव्हाड यांनी हिम्मत दाखवावी असे आव्हान मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे माजी सभापती प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी दिले आहे.

prasad lad
कल्याणमध्ये एअरटेल मोबाईल टॉवरसाठी वीजचोरी

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या संक्रमण शिबिरात होणारी घुसखोरी ही अत्यंत लज्जास्पद बाब असल्याचे म्हंटले होते. कोणिही येत कोणाच्याही घरात घुसत. 'जिसकी लाठी उसकी भैस' अशा पद्धतीने घरे बळकावली जातात. तिथल्या रेंट कलेक्टर, तेथील म्हाडाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी हे सगळे ह्या प्रकरणात सामील आहेत. गरीब माणसाने जगायचे कसे. ह्यावरती काहीतरी कठोर कारवाई करावीच लागेल. ज्याच हक्काचे घर आहे, त्याला त्याचे घर मिळायला हवे. घुसखोर कोणिही असो त्याला घरातून काढून कायद्याच्या कचाट्यात अडकवून जेलमध्ये टाकायला हवे, असे ट्विट आव्हाड यांनी केले होते. यावर भाजपा आमदार तसेच मुंबई इमारत व दुरुस्ती पुर्नरचना मंडळाचे माजी सभापती प्रसाद लाड यांनी टीका केली आहे.

आव्हाड यांनी म्हाडा संक्रमण शिबिरातील घुसखोरी च्या मुद्द्यावर ट्विट करण्यापेक्षा दोषी अधिकाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करावा. आव्हाड यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात मास्टर लिस्टमध्ये किती घर दिली गेली याची माहिती ही समोर यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर आता घुसखोरांकडून आता पैसे लाटण्याचे काम गृहनिर्माण मंडळाकडून होण्याची शक्यता आहे. याच्यातला वाझे ही शोधला पाहिजे, असा आरोप ही लाड यांनी केला. घुसखोर हे अधिकारी आणि दलाल यांच्या माध्यमातून फसवले गेलेली लोक आहेत. त्यांना पैसे आकारून घर दिली पाहिजेत, असे लाड म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com