ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! वेतन वाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा होणार, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Pratap Sarnaik: एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा थकीत हप्ताबाबत प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत वेतन वाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा होईल, असे सांगितले आहे.
Pratap Sarnaik on ST employee Salary Hike

Pratap Sarnaik on ST employee Salary Hike

ESakal

Updated on

मुंबई : एसटीच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात सोबत देण्यात येणारा वेतन वाढीचा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बॅक खात्यात जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच या अनुषंगाने येत्या २४ फेब्रुवारीला काही कामगार संघटनांनी पुकारलेल्या आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com