पाकिस्तानी क्रेडिट कार्ड प्रकरणानंतर प्रताप सरनाईकांनी कंगनाविरोधात आणि बदनामी करणाऱ्या माध्यमांविरोधात दाखल केला हक्कभंग

पाकिस्तानी क्रेडिट कार्ड प्रकरणानंतर प्रताप सरनाईकांनी कंगनाविरोधात आणि बदनामी करणाऱ्या माध्यमांविरोधात दाखल केला हक्कभंग

मुंबई : शिवसेनेचे आमदार आणि नेते प्रताप सरनाईक यांनी आज पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना रनौत आणि खोट्या बातम्या चालवणाऱ्या माध्यमांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे. स्वतः प्रताप सरनाईक यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली.   

प्रताप सरनाईक म्हणालेत की, "मी मुंबईत आल्यावर माझा जबडा तोडणाऱ्यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड मिळालं असं ट्विट चित्रपट अभिनेत्री कंगना रनौतने केल्याने माझी व माझ्या कुटुंबीयांची सर्व देशभर बदनामी झाली, तसेच मला माझ्या कुटुंबियांना नाहक त्रास झाला. त्यामुळे मी कंगना आणि खोट्या बातम्या चालवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला आहे.

पुढे सरनाईक म्हणतात, "कंगनाच्या ट्विटच्या आधारे ज्यांनी ज्यांनी या खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत त्यांच्याविरोधात मी दाखल केलेला हक्कभंग प्रस्ताव मंजूर करावा अशी विनंती मी अध्यक्षांना केलेली आहे. गेले अनेक दिवस ED कडून माझी आणि आणि कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. त्या चौकशीला मी आणि माझे कुटुंबीय सर्वतोपरी मदत करत आहोत.  मी ED ला हेही सांगितलं आहे की, "ज्या ज्या वेळेस माझ्या चौकशीची गरज असेल त्यावेळी स्वतः प्रताप सरनाईक एका फोनवर दोन तासात हजर असेल". मात्र, प्रताप सरनाईक यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड मिळालं, प्रताप सरनाईक यांच्या घरी राफेलचे कागदपत्र मिळलेत, प्रताप सरनाईक यांच्याकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या पार्टनरशिपचे कागदपत्र मिळाले, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करून माझी आणि माझ्या कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी कंगना विरोधात मी आज हक्कभंग दाखल केलेला आहे.

येत्या काळात माझ्याबद्दल अनेक बातम्या तुम्हाला मिळतील. त्यामुळे माझी बदनामी करण्याचं हे कटकारस्थान आहे,  असं माझं स्पष्ट मत आहे. या हक्कभंग प्रस्तावाला तातडीने मान्यता द्यावी अशी मी मागणी केलेली आहे. 

pratap sarnaik kangana ranaut fake news pakistani credit card infringement

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com