
मुंबई : यंदा गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी शासनाने राज्यातील १.५ लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळावे, अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. याबाबत लवकरच शासनाकडून निर्णय जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.