
मुंबई : नागपूर ते नागभीड हा १०६ किलोमीटरचा नॅरो गेज लोहमार्ग ब्रॉड गेज मध्ये रुपांतरीत करण्याचे काम गतीने पूर्ण होत असून, दिवाळीपूर्वी ईटावरी ते उमरेड या ५१ किमी मार्गाची लोकार्पण होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मंत्रालयात बोलावलेल्या महारेल कार्पोरेशनच्या कामाच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते.