

Thane Metro Update
ESakal
ठाणे : महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली ठाण्यातील मेट्रो सेवा येत्या तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा कार्यअहवाल सरनाईक यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.