

Transport Minister Pratap Sarnaik Denies Land Grabbing Allegations
Sakal
भाईंदर : ‘‘मी वैयक्तिक कोणतीही शासकीय जमीन मिरा भाईंदरमध्ये घेतलेली नाही अथवा लाटलेली नाही. माझ्या सुनेच्या शैक्षणिक संस्थेला रीतसर निविदा प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर व सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर नियमानुसार मिरा रोडची जमीन मिळाली आहे,’’ असा खुलासा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांबाबत केला आहे. वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपानुसार ही जमीन चार एकर नसून केवळ ८ हजार ०२५ चौरस मीटर एवढीच असल्याचेही त्यांनी सांगितले.