esakal | मुंबई दुर्घटनेबाबत चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करा - प्रविण दरेकर
sakal

बोलून बातमी शोधा

pravin Darekar

मुंबई दुर्घटनेबाबत चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करा - प्रविण दरेकर

sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई : पहाटेच्या पावसामुळे मुंबईत (Mumbai) महापालिकेच्या (BMC) निकृष्ट दर्जाच्या संरक्षक भिंती कोसळून (Wall Collapse) अनेक जण मृत्युमुखी (Death) पडले. याप्रकरणी चौकशी (Inquiry) करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर(Pravin Darekar) यांनी केली. दरेकर यांनी आज दुर्घटनास्थळांना भेट दिली. या दुर्घटनांना महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, असाही आरोप त्यांनी केला. महापालिकेने मुंबईत जेथे अशा संरक्षक भिंती बांधल्या आहेत तेथील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी (People Safety) प्रयत्न करावेत, अशीही मागणी त्यांनी केली. ( Pravin darekar says take Action Against responsible people for making weak wall- nss91)

हेही वाचा: मुंबईसह 'या' ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस ? रेड अलर्ट जारी

मुंबईत अजूनही अशा दुर्घटना घडण्याची भीती आहे. त्या टाळण्यासाठी राज्य सरकार व महापालिकेने तातडीने उपाययोजना करावी. दर पावसाळ्यात मुंबईकरांचे जाणारे बळी हे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे बळी आहेत. भिंती-दरडी कोसळणे, त्याच ठिकाणी पाणी तुंबणे हे थांबविणे महापालिकेला जमत नाही. विक्रोळीची पडलेली भिंत यापूर्वीही एकदा पडल्याने पुन्हा बांधली होती, ती आता पुन्हा पडली, असेही दरेकर यांनी दाखवून दिले. पालिकेने फक्त धोक्याची नोटीस बजावून हात झटकू नये, तर या रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

शिक्षणाची जबाबदारी घेणार

या अपघातात काही मुले अनाथ झाली आहेत, अशाच एका कुटुंबाचीही दरेकर यांनी भेट घेतली. या कुटुंबातील अनाथ लहान भाऊ-बहिण यांच्या शिक्षणाची जबाबदारी भाजपतर्फे उचलण्यात येईल असे वचन त्यांनी त्या कुटुंबाला दिले.

loading image