Pravin Darekar | मी कालच राजीनामा दिलाय; अपात्रतेच्या कारवाईवर दरेकरांचे प्रत्युत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pravin-Darekar

आता या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.

मी कालच राजीनामा दिलाय; अपात्रतेच्या कारवाईवर दरेकरांचे प्रत्युत्तर

मुंबई - मजूर प्रवर्गातून निवडणूक लढवल्यानंतर प्रविण दरेकर (Pravin Darekar) हे मुंबई बँकेच्या (Mumbai Bank) निवडणुकीत विजयी झाले होते. दरम्यान, सहकार विभागाने त्यांना अपात्र ठरवून नोटिस पाठवली आहे. आता या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. तसंच आपल्यावर अपात्रतेची कारवाई झालेली नाही, केवळ सूचना दिल्या असल्याचंही दरेकर म्हणाले.

सहकार विभागाने अपात्र ठरवल्यानंतर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर म्हणाले की, मी याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. मी राज्याचा विरोधीपक्ष नेता असल्यानं काही माध्यमांना हाताशी धरून हा प्रकार सुरु आहे. मी सीबीआयला तक्रार करणार आहे. संबंधित व्यक्तीवर का कारवाई नाही केली असा प्रश्नही त्यांनी विचारला. अपात्र ठरवताना दरेकर यांची संपत्ती जास्त असल्याचंही सहकार विभागाने म्हटलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले की, देशातील मजुरानं श्रीमंत होऊ नये असं कुठं लिहलेलं नाही.

हेही वाचा: प्रवीण दरेकर मजूर नाहीत; सहकार विभागाने ठरवलं अपात्र

मुंबै बँकेच्या निवडणुकीत दरेकर हे आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांनी दोन ठिकाणाहून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. आता मजूर म्हणून अपात्र ठरवल्यानंतर दरेकर म्हणाले की, मी मुंबै बँकेत 21 च्या 21 जागा निवडून दिल्या. मी दोन ठिकाणी निवडून आलोय. मी काल निकाल घोषित झाल्यानंतरच मजूर विभातून निवडून आलो त्याचा राजीनामा दिला आहे.

गलवान खोऱ्यात चीनच्या घुसखोरीवरून सध्या देशात केंद्र सरकारवर टीका केली जातेय. यावरून विचारले असता दरेकर म्हणाले की,'गलवान खोऱ्याची काळजी घ्यायला पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री सक्षम आहेत' ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही टीका केली. ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे वक्तव्य करण्यात माहीर आहेत. त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागायला हवी.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top