प्रायोगिक नाट्यगृहाला आता मार्चअखेरचा मुहूर्त!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

मुंबई : राज्यातील पहिले प्रायोगिक रंगभूमी नाट्यगृह प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी इमारतीच्या पाचव्या व सहाव्या मजल्यावर उभारण्यात येत आहे. या नाट्यगृहाचे काम फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी सांगितले होते. परंतु सद्यस्थिती पाहता हे काम मार्चच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता कमी आहे. 

#BMC मुख्यालयात सुरू होणार पर्यंटन

मुंबई : राज्यातील पहिले प्रायोगिक रंगभूमी नाट्यगृह प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी इमारतीच्या पाचव्या व सहाव्या मजल्यावर उभारण्यात येत आहे. या नाट्यगृहाचे काम फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी सांगितले होते. परंतु सद्यस्थिती पाहता हे काम मार्चच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता कमी आहे. 

#BMC मुख्यालयात सुरू होणार पर्यंटन

प्रायोगिक नाट्यगृहाची जागा सुमारे 18 वर्षे वापराविना पडून होती. तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी भूमिपूजन करताना प्रायोगिक नाट्यगृह मार्चमध्ये खुले होईल, असे सांगितले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे नाट्यगृहाचे काम खोळंबल. या कामाला नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात झाली; परंतु कामाची गती संथ असल्याने नाट्यगृहाचा केवळ ढाचा तयार झाल्याचे दिसते. 

नाट्यगृहाचे छत व फरसबंदीचे काम पूर्ण झाले असून, सुशोभीकरण बाकी आहे. मेकअप रूम, शौचालय यांच्या जागा तेवढ्या निश्‍चित झाल्या आहेत. त्यामुळे प्रायोगिक नाट्यगृहाच्या उद्‌घाटनासाठी फेब्रुवारीची अखेर अथवा मार्चच्या सुरुवातीचा मुहूर्त गाठला जाण्याची शक्‍यता धूसर असल्याचे सांगण्यात येते. 

हाजी अली दर्ग्यांला बुलंद दरवाजा उभारणार! 

राज्य सरकारने या नाट्यगृहासाठी प्रकल्प देखरेख समिती नेमली होती. या समितीत अकादमीचे प्रभारी प्रकल्प संचालक बिभीषण चवरे (अध्यक्ष), सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप-अभियंता, अग्निशमन दलाचे अधिकारी अजित दांडेकर, प्रदीप मुळ्ये, नंदलाल पेठे, शीतल तळपदे यांचा समावेश आहे. हे नाट्यगृह व बहुउद्देशीय सभागृह सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारले जात आहे. 

प्रायोगिक नाट्यगृह आणि बहुउद्देशीय सभागृहाच्या करारपत्राप्रमाणे हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी मार्चच्या अखेरपर्यंत मुदत दिली आहे. बहुउद्देशीय सभागृहाचे काम पूर्ण होत आहे. नाट्यगृहासाठी आसने आली असून, पुढील महिन्यात काम पूर्ण होईल. 
- बिभीषण चवरे, प्रभारी प्रकल्प संचालक, पु. ल. देशपांडे कला अकादमी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The prayogik natygruh is now the end of March