esakal | #BMC मुख्यालयात सुरू होणार पर्यटन! मंत्री अदित्य ठाकरेंचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

#BMC मुख्यालयात सुरू होणार पर्यटन! मंत्री अदित्य ठाकरेंचा पुढाकार

#BMC मुख्यालयात सुरू होणार पर्यटन! मंत्री अदित्य ठाकरेंचा पुढाकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पालिकेच्या ब्रिटिशकालीन इमारतीमधील सुंदर कलाकुसरीचा आनंद सर्वांनाच घेता येणार आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी पालिका मुख्यालयात पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून तशा सूचना पर्यटन विभागाला देण्यात आल्या आहेत. पर्यटन विभागाने यावर निर्णय घेतल्यानंतर पर्यटन सुरू होणार आहे. 

हेही वाचा - कॉंग्रेस, शिवसेनेत अंतर्गत कलह! बंडखोरीची शक्यता!

सीएसएमटी येथे पालिका मुख्यालयाची इंग्रजी व्ही आकाराची ब्रिटिशकालीन इमारत आहे. 1894 मध्ये ही इमारत बांधण्यात आली असून ही इमारत गॉथिक शैलीच्या वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. या इमारतीने मुंबईच्या वैभवात भर घातली असून ही इमारत मुंबईची ओळख बनली आहे. ही इमारत पाहण्यासाठी केवळ देशातीलच नाही, तर जगभरातील पर्यटक येतात. पालिका मुख्यालयात कामकाज सुरू असल्याने पर्यटकांना इमारतीच्या आत जाऊन इमारतीचं सौंदर्य न्याहाळणे किंवा छायाचित्रण करणे शक्‍य होत नाही. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पालिकेने उभारलेल्या सेल्फी पॉइंटवरूनच पर्यटकांना या इमारतीचे दर्शन घ्यावे लागते. 

हेही  वाचा - रोहित पवारांची आमदारकी धोक्यात!

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी पालिका कामकाजाशी संबंधित अनेक बैठका पालिका मुख्यालयात घेतल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनादेखील मुख्यालयाच्या आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकामाने भुरळ घातली. पर्यटनमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी मुख्यालयात पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून तशा सूचनाही पर्यटन विभागाला दिल्या आहेत. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पालिकेला सुट्टी असल्याने याच दिवशी पर्यटन सुरू करण्यात येणार आहे. पर्यटन विभाग यावर विचार करीत असून लवकरच पर्यटन सुरू करण्यात येणार आहे. 

इमारतीची वैशिष्ट्ये 
* 1884 ला बांधकाम सुरू, 1893 ला बांधकाम पूर्ण 
* वास्तुविशारद फ्रेडरिक विलियम स्टीव्हेन्स यांच्या कल्पनेतून ही इमारत साकारण्यात आली आहे. 
* गॉथिक वास्तुकलेची रचना शैली 
* सोनेरी बेसॉल्ट दगडाचा वापर 
* युनेस्कोने 2005 मध्ये इमारतीला जागतिक वारसा म्हणून जाहीर केले.