कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कारवाईला सुरवात, उद्यापासून ऑफिसेसवर पडणार धाडी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कारवाईला सुरवात, उद्यापासून ऑफिसेसवर पडणार धाडी

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव संसर्गाच्या पातळीवर पोहचू नये म्हणून मुंबई महापालिकेने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी शहरातील गर्दी कमी करण्यासाठी खासगी आस्थापनांना 50 टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

शहरातील गर्दी कमी करण्यासाठी फेरीवाले हटवण्यासोबतच महत्त्वाच्या बाजारपेठा बंद करण्यापासून रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून पाच पट म्हणजे एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. 

देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहे. परदेशातून राज्यात आलेल्या प्रवाशांपासून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विषाणूची बाधा झाली आहे. कोरोना सध्या दुसऱ्या टप्प्यावर आहे; तो तिसऱ्या टप्प्यावर न जाण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील एकदोन दिवसांत आस्थापनांचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती आयुक्त परदेशी यांनी दिली. 

महापालिकेने फेरीवाल्यांकडे होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाज्या, फळे तसेच इतर जीवनावश्‍यक वस्तू विकणाऱ्यांव्यतिरिक्त इतर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. फोर्ट येथील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट बंद करण्यात आला असून खाऊ गल्ल्यांतील खाद्य विक्रेत्यांनाही व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले. त्यासाठी गरजेनुसार निर्णय घेण्यात येतील असेही त्यांनी नमूद केले. 

नियम मोडल्यास कारवाई होणार 

- 50 टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी न दिल्यास कंपन्यांवर भादंवि 188 अंतर्गत कारवाई 
- बाजारातील विक्रेत्यांनीही आदेशाचे पालन न केल्यास दोन महिन्यांपर्यंत तुरुंगवास 
- फेरीवाल्यांवर सहा महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास 
- रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून 200 रुपयांऐवजी एक हजार दंडआकारणी 

उद्यान, मैदानेही बंद? 

मुंबईतील उद्याने, मैदाने बंद करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही; मात्र तेथे गर्दी कायम असल्याचे निदर्शनास आल्यास तेही बंद करावे लागेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

उपाहारगृहांवरही नियंत्रण 

उपाहारगृहांमध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश प्रभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. उपाहारगृहात ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याची सूचनाही देण्यात आल्या आहे. त्यानंतरही गरज पडल्यास उपाहारगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

as precautionary measures for COVID19 raids on private offices will be conducted

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com