esakal | गर्भवती महिलांनो, 'आरएच' विसंगतीकडे गांभीर्याने बघा
sakal

बोलून बातमी शोधा

pregnant woman

गर्भवती महिलांनो, 'आरएच' विसंगतीकडे गांभीर्याने बघा - डॉ.रिषमा धिल्लन पै

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : गर्भवती स्त्री 'आरएच' निगेटिव्ह (Pregnant Woman) असेल तर गरोदरपणात तिच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा स्त्रियांची गरोदरपणात विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषत: तिच्या पोटातील बाळाचा रक्तगट आरएच पॉझिटिव (RH Positive) असेल तर आणखी काळजी घ्यावी लागते. या स्थितीचा मातेच्या आरोग्यावर फारसा परिणाम (Impact on health) होत नाही पण तिच्या पोटातील बाळावर (impact on baby) याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून तिच्या आरएच निगेटिव्ह रक्तगटाची (Blood group RH negative) विशेष काळजी घ्या, असे डॉ.रिषमा धिल्लन पै, कन्सल्टंट प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ सुचवत आहेत. (Pregnant Woman should take care of RH blood Factor for health purpose)

'आरएच फॅक्टर' म्हणजे काय ?

रक्तगटांचे 'ए,बी','एबी' आणि 'ओ' हे चार प्रमुख प्रकार आहेत. व्यक्तीमधील जनुकांनुसार निश्चित होणारा रक्तगट आई वडिलांकडून आनुवांशिकतेने येतो. शिवाय यात 'आरएच फॅक्टर' नावाचे एक प्रथिन असते. 'आरएच' पॉझिटिव (+) व्यक्तींमध्ये हे प्रथिन असते, तर 'आरएच' निगेटिव (-) व्यक्तींमध्ये हे प्रथिन नसते. त्यानुसार रक्तगटांचे 8 प्रकार होतात.

'आरएच' विसंगती म्हणजे काय?

आरएच किंवा ‘ऱ्हिसस’ फॅक्टर हे एक आनुवंशिकतेने येणारे प्रथिन आहे आणि लाल रक्तपेशींवरील पेशींच्या पडद्याच्या पृष्ठभागावर ते आढळते. तुमच्या रक्तामध्ये हे प्रथिन असेल तर तुम्ही आरएच पॉझिटिव असता आणि ते नसेल तर आरएच निगेटिव असता. अर्थात रक्तामध्ये आरएच घटक असणेही एक सामान्य अवस्था आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीला कोणता आजार आहे असा होत नाही किंवा याचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही.

हेही वाचा: गिरगाव चौपाटी जवळचं प्रसिद्ध 'क्रिस्टल' हॉटेल बंद होणार?

गरोदर स्त्रियांची काळजी घेण्याची गरज

गरोदर स्त्री 'आरएच निगेटिव' असेल तर गरोदरपणात तिच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 'आर एच-निगेटिव' रक्तगट असलेल्या गरोदर स्त्रियांची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषत: तिच्या पोटातील बाळाचा रक्तगट 'आरएच पॉझिटिव' असेल तर आणखी काळजी घ्यावी लागते. कारण,या स्थितीला आरएच कम्पॅटिबिलिटी किंवा विसंगती असे म्हणतात. याचा मातेच्या आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही पण तिच्या पोटातील बाळावर याचा परिणाम होऊ शकतो म्हणून तिच्या आर एच निगेटिव रक्तगटाची विशेष काळजी घ्यावी लागते.

आईच्या शरीराची तिच्या बाळाच्या आरएच पॉझिटिव रक्ताशी आंतरक्रिया होऊन अँटिबॉडीज (प्रतिपिंडे) तयार होतात, तेव्हा आरएच विसंगती निर्माण होते. विशेषत: याच स्त्रीच्या दुसऱ्या गरोदरपणात बाळ आरएच पॉझिटिव असेल, तर तत्काळ अँटिबॉडीज तयार होतात. आरएच पॉझिटिव बाळाची वार ओलांडून या अँटिबॉडीज गेल्या की त्याच्या लाल रक्त पेशींचे नुकसान होते. लाल रक्तपेशी शरीरात ऑक्सिजन प्रवाहित ठेवण्यासाठी अत्यावश्यक असतात. अशा परिस्थितीत लाल रक्तपेशींचे वेगाने नुकसान झाल्याने अॅनिमियासारखी अवस्था निर्माण होऊन बाळासाठी प्राणघातक ठरू शकते. नवीन लाल रक्तपेशी निर्माण करण्याची बाळाच्या शरीराची क्षमता कमी झाल्यास कठीण होते. यातून कावीळ, हार्टफेल्युअर, यकृताचे काम मंदावणे आदी अवस्था येतात आणि बाळासाठी हे प्राणघातक ठरू शकते.

हेही वाचा: उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यावर राणे तुम्ही काय प्रतिक्रिया दिली ते जरा आठवा - अरविंद सावंत

इनडायरेक्टकूम्ब्स चाचणीने निदान शक्य

गरोदर स्त्रीची इनडायरेक्टकूम्ब्स चाचणीही साधी रक्त चाचणी करून या अवस्थेचे निदान करता येते. रक्तामध्ये पेशी नष्ट करणाऱ्या अँटिबॉडीज आहेत की नाही याचे निदान या चाचणीद्वारे करता येते आणि तुमचे डॉक्टर यावर काय करायचे त्याबद्दल सल्ला देऊ शकतात. बाळाची आई आर एच निगेटिव असेल आणि बाबा आर एच पॉझिटिव्ह असेल तर इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन आईला देऊन तिच्या शरीरात आरएचअँटिबॉडीज तयार होणे रोखता येते. गरोदरपणाच्या 28 आठवड्यांपर्यंत हे इंजेक्शन दिले जाऊ शकते आणि बाळाचा रक्तगट पॉझिटव असेल तर प्रसुतीनंतर ही देता येते. या उपायांनी बाळाचे प्रभावीरित्या संरक्षण होऊ शकते.

loading image