President Draupadi Murmu: महाराष्ट्र महान राज्य, यानं देशाच्या उन्नतीसाठी कार्यरत राहावं - द्रौपदी मुर्मू

महाराष्ट्रात विविध भाषा बोलणारे अनेक जण एकत्र राहतात.
Droupadi Murmu
Droupadi Murmusakal
Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्र हे खरंच खूप महान राज्य आहे. या राज्यानं भविष्यात देशाच्या उन्नतीसाठी कार्यरत रहावं, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्याचं कौतुक केलं आहे. तसेच अपेक्षाही व्यक्त केली आहे. मुंबईच्या दौऱ्यावर एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. (President Draupadi Murmu praises for Maharashtra says to contribute to betterment of India)

Droupadi Murmu
Uddhav Thackeray: बीएमसीची चौकशी करणार तर पीएम केअर फंडाचीही करा! उद्धव ठाकरेंची मागणी

मुर्मू म्हणाल्या, देशाच्या आत्तापर्यंतच्या यशात महाराष्ट्राचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र खरंच खूप महान राज्य आहे. भविष्यातही तुम्ही अशाच पद्धतीनं देशाच्या उन्नतीसाठी कार्य करत राहाल अशी आशा आहे. महाराष्ट्रात विविध भाषा बोलणारे अनेक जण एकत्र राहतात त्यामुळं महाराष्ट्राचं योगदान देशाच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे. (Latest Marathi News)

Droupadi Murmu
NCP Meeting: शरद पवारांची अध्यक्षपदी निवड; तटकरे, पटेल, कोहली निलंबित

महाराष्ट्राला एक वेगळं सौंदर्य लाभलेलं आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा, प्राचीन लेण्या आणि महाराष्ट्राची असलेली वेगळी संस्कृती ही सर्वांना आपलंस करणारी आहे. साधू-संतांची एक वेगळी संस्कृती या राज्याला लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक ऐतिहासिक उदाहरण याच राज्यातून देशाला मिळालेला आहे. (Marathi Tajya Batmya)

Droupadi Murmu
Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीचा मविआत समावेश होणार?; आंबेडकरांचा ठाकरेंना अल्टिमेटम

महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मोठं योगदान या राज्याला लाभलेलं आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा देणारे लोकमान्य टिळक यांनी या राज्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. महाराष्ट्राला वैभवशाली सांस्कृतीक कला लाभलेली आहे. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यादेखील याच राज्यातून आल्या, अशा शब्दांत महाराष्ट्राच्या विविधतेचंही कौतुक त्यांनी केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.