राष्ट्रपती राजवट म्हणजे काही लोकांचा हट्ट - सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

भाजपची प्रत्येक राजकीय घडामोडीवर नजर आहे, अशी प्रतिक्रिया भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. काही पक्षांकडून जनादेशाचा अनादर करण्यात आलाय. त्यांच्या अनादरामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावलाय. महाराष्ट्रात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं ही भाजपची इच्छा होती असंही भाजपचे जेष्ठ नेते आणि  भाजप कोअर कमिटीचे मेंबर सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.  

शेतकऱ्यांसाठी सध्याची महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अशात महाराष्ट्र लवकरात लवकर सत्तास्थापन व्हावी अशी भाजपची भूमिका होती. तर पर्याय असल्याचं सांगून मित्रपक्षाने राज्यात राष्ट्रपती राजवटीची परिस्थिती ओढवली. काही लोकांनी जो हट्ट केला, त्याचा हा परिणाम आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. 

राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असताना सुद्धा महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. मात्र, लवकरच राज्याला स्थिर सरकार प्राप्त होईल, अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो - देवेंद्र फडणवीस

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. भाजप सध्या राज्यात घडत असलेल्या प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेऊन आहे असंही त्यांनी म्हटलंय. 

WebTitle : Presidential rule is the hoot of some people says sudhir mungantiwar 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Presidential rule is the hoot of some people says sudhir mungantiwar