
Mumbai News: पोलिस दलात उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक सेवा बजावणाऱ्या नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील चार पोलिस अधिकाऱ्यांना प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक पोलिस आयुक्त धर्मापाल बनसोडे, कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कारभारी कोते व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र विठ्ठल म्हात्रे या चार अधिकाऱ्यांचा यात सामवेश आहे. महाराष्ट्रातील एकूण ४३ पोलिस या पदकाचे मानकरी ठरले आहेत.