मदत करण्याच्या बहाण्याने ते एटीएममध्ये शिरायचे आणि...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 January 2020

दोघांच्या टोळीने घातला राज्यभर हैदोस

ठाणे : मदतीच्या बहाण्याने एटीएम केंद्रामध्ये पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या राज्यभरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन तरुणांना गुन्हे शाखा युनिट एकने शिताफीने अटक केली आहे. श्रीकांत गोडबोले (25, रा. मलंग रोड, कल्याण) आणि 
प्रवीण साबळे (22, रा. सिन्नर, नाशिक) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून वेगवेगळ्या बॅंकांचे 53 एटीएम कार्ड जप्त केले आहेत.

हेही वाचा - म्हाडाच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार

या दोघांनी राज्यभरात विविध एटीएम केंद्रांत नागरिकांची फसवणूक केल्याचे तब्बल 50 हून अधिक गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली. चोरटे शिळ-डायघर येथे भाड्याच्या घरात राहत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी श्रीकांत आणि प्रवीण या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अशी होती त्यांची मोडस आॅपरेंडी

नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने हे दोघे त्यांचे पासवर्ड लक्षात ठेवून त्यांच्या एटीएम कार्डची हातचलाखीने बदली करून त्यांना बनावट एटीएम कार्ड देत असत. संबंधित व्यक्ती एटीएम केंद्रातून बाहेर गेल्यानंतर हे दोघे त्यांच्या एटीएम कार्डच्या मदतीने संबंधितांच्या बॅंक खात्यातील रक्कम काढत असत.

महत्त्वाची बातमी - मनसे-भाजप जवळ येता आहेत? वाचा काय आहे बातमी

या भामट्यांनी ठाणे मुंबईसह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, पुणे, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, नाशिक, धुळे, जळगाव, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मालेगाव, वाशिम, जालना, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि यवतमाळ आदी जिल्ह्यांतील नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे, त्यांनी ठाणे गुन्हे शाखा 022-25343565 येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

web title :With the pretending of helping, they looted many atm machines


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the pretending of helping, they looted many atm machines