esakal | झालंय काय? फ्रीजऐवजी लोक खरेदी करतायेत माठ...
sakal

बोलून बातमी शोधा

झालंय काय? फ्रीजऐवजी लोक खरेदी करतायेत माठ...

उन्हाळा सुरू झाल्यामुळे आता अंगाची लाहीलाही होत असून, घसा कोरडा पडत असल्याने पाणी पिऊनदेखील तहान भागत नाही. त्यामुळे माठातील पाणी पिण्याकडे नागरिकांचा ओढा आहे. मात्र, यंदा हा थंड पाणी देणारा फ्रीज अर्थात माठांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. 

झालंय काय? फ्रीजऐवजी लोक खरेदी करतायेत माठ...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : उन्हाळा सुरू झाल्यामुळे आता अंगाची लाहीलाही होत असून, घसा कोरडा पडत असल्याने पाणी पिऊनदेखील तहान भागत नाही. त्यामुळे माठातील पाणी पिण्याकडे नागरिकांचा ओढा आहे. मात्र, यंदा हा थंड पाणी देणारा फ्रीज अर्थात माठांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. 

ही बातमी वाचली का? रुग्णवाहिका चालकाची मुलगी झाली एमबीबीएस डॉक्टर

मुंबईत भाड्याने राहून पोटाची खळगी भरणाऱ्या नागिकांची संख्या मोठी आहे. त्यातच दर अकरा महिन्यांनी घर बदलावे लागत असल्याने होणाऱ्या त्रासामुळे शीतकपाट (फ्रीज) घेता येत नाही. तर कोणी घरातील जागेअभावी शीतकपाट घेत नाही. काही जण शीतकपाटामुळे विजेचे देयक अवाच्या सव्वा येत असल्यामुळे असणारे शीतकपाट देखील बंद करून ठेवत आहेत. त्यामुळे थंड पाण्यासाठी माठातीलच पाण्यालाच पसंती दिली जाते. पण सध्या हे माठदेखील महागले असून, त्यांच्या दरात 30 ते 40 रुपयांनी वाढ झाली आहे. मातीचे भाव वाढल्यामुळे माठाच्या किमती वाढल्या आहेत. असे विक्रेते भूपेंद्र यादव यांनी सांगितले. तसेच माठाला नळजोडणी; तसेच सिमेंटचा वापर करावा लागत असल्याने खर्चात वाढ झाली आहे. छोटा माठ विनानळ 180 रुपये; तर नळ असलेला 220 रुपये, मोठा माठ 300; तर नळ लावलेला 340 रुपयेपर्यंत विकला जात आहे. 

ही बातमी वाचली का? आघाडी सरकार 'चले जाव'चा नारा

शीतकपाटामुळे विजेचे देयक हे जास्त प्रमाणात येत आहे. शीतकपाटाला जास्त युनिट लागत असल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात. त्यातच विजेची देयकेहू अवाच्या सव्वा येत असल्यामुळे, शीतकपाट बंद करून ठेवले आहे; तर गार पाणी पिण्यासाठी माठातील पाणीच चांगले वाटते. 
- प्रदीप बोरकर, नागरिक. 

नवी मुंबईत सध्या एक कंटनेर माठ उतरवण्यात आले आहेत. माठाच्या किमतीत यंदा वाढ झाली आहे. राजस्थान व अहमदाबादमधून हे माठ बाजारात आले असून, होळीनंतर माठाची मागणी वाढेल. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 30 ते 40 रुपयांनी वाढ झाली आहे. 
- भूपेंद्र यादव, विक्रेते 

loading image
go to top