Mumbai : राज्यातील प्राथमिक शाळा सुरू होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

schools
राज्यातील प्राथमिक शाळा सुरू होणार?

राज्यातील प्राथमिक शाळा सुरू होणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात कोरोना नियंत्रणात आल्याने जवळपास सर्वच गोष्टी सुरू झाल्या आहेत. पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याबाबत चाईल्ड कोविड टास्क फोर्सने सकारात्मकता दर्शवली आहे. याबाबत गुरूवारी (ता. २५) होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शाळा, महाविद्यालये तसेच इतर शैक्षणिक संस्था सुरू झाल्या आहेत.

परंतु पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा अद्याप सुरू झालेल्या नाही. विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यासाठी त्यांचे लसीकरण होईपर्यंत अटी-शर्थी पाळून शाळा सुरू करता येऊ शकतात. तसेच १२ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे याबाबत टास्क फोर्सने सकारात्मक शिफारसी दिल्या आहेत, असेही टोपे पुढे म्हणाले. अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाचा डेल्टा विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

त्यापार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील रुग्णसंख्येकडे आपण बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोनाची परिस्थिती अशीच राहिल्यास किंवा केसेस कमी झाल्यास निर्बंध आणखी शिथिल केले जातील, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

जगातील अनेक देशांमध्ये तिसरी लाट आली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सावधगिरी बाळगळी पाहिजे. लोकांनी त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे.

- राजेश टोपे, आरोग्यमंत्री.

loading image
go to top