esakal | रूग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करताना चौघांचा मृत्यू; एकनाथ शिंदेंची कबुली

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde
रूग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करताना चौघांचा मृत्यू; एकनाथ शिंदेंची कबुली
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: मुंब्रा कौसा येथील प्राइम क्रिटीकेअर या रुग्णालयात आग लागली. या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची रुग्णालयाची पाहणी केली आहे. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मृतांच्या कुटुंबियांना सरकार आणि ठाणे मनपा ५ लाखांची मदत करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागलेली नाही. आग लागल्यानंतर सर्वत्र धूर पसरला. त्यानंतर मागच्या खिडक्या तोडून रुग्णांना बाहेर काढण्यात आलं. रुग्णांना बाजूच्या बिलाल रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं. रुग्णांना तातडीनं शिफ्ट करण्याची आवश्यकता होती.

हेही वाचा: रेमिडीसीवीर इंजेक्शन खासगी व्यक्तीला मिळतातच कसे?, हायकोर्टाचा सवाल

घटनास्थळी सर्व यंत्रणा तातडीनं दाखल झाली. त्यानंतर यंत्रणेनं युद्धपातळीवर काम केलं. मात्र रुग्णालयातून इतरत्र नेताना ४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे अतिशय दुर्दैवी असं म्हणत सर्व रुग्णालयाचं फायर ऑडिट झालं पाहिजे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

नॉन कोविड रुग्णालय असो किंवा कोविड रुग्णालय त्याचे फायर ऑडिट होणं गरजेचं आहे. स्ट्रक्चरल ऑडिट तसंच ऑक्सिजनचंही ऑडिट झालं पाहिजे.अशा प्रकारच्या वारंवार सूचना दिलेल्या असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागली नसून मीटर बॉक्सच्या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हेही वाचा: Prime Criticare Hospital:ठाण्यात रुग्णालयाला आग, चार जणांचा होरपळून मृत्यू

या आगीत दुर्दैवी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची तर जखमी झालेल्यांना १ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती दिली. तसंच ठाणे पालिकेच्या वतीनं देखील ५ लाखांची मदत करण्यात येणार असल्याचंही पालकमंत्र्यांनी सांगितलं.

प्राइम क्रिटीकेअर रुग्णालय आग

पहाटे पावणे चारच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी झाल्या. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ही लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग लागल्यानंतर रुग्णालयाच्या प्रशासनानं तातडीनं रुग्णांना बाहेर काढलं. रुग्णालयात २६ रुग्ण होते. दरम्यान त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिकेनं या संदर्भातील माहिती दिली आहे.

prime criticare hospital fire eknath shinde reaction kausa mumbra