पोलीस दुसऱ्या कामात गुंतले अन् येथे कैदी रफूचक्कर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

जिल्हा कारागृहात  शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांनी कारागृहाच्या दगडी भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न शुक्रवारी (ता.22) केला

अलिबाग : जिल्हा कारागृहात  शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांनी कारागृहाच्या दगडी भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न शुक्रवारी (ता.22) केला. यातील एका कैद्याला पकडण्यात यश आले असून दुसरा कैदी हा फरार झाला आहे. फरार कैद्याला पकडण्यासाठी अलिबाग शहराच्या सीमेवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

महत्वाची बातमी सावधान..! मुंबईत "या" वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक

अलिबागमधील जिल्हा कारागृहातून कैदी पळून जाण्याची ही पाचवी ते सहावी घटना आहे. अलिबाग तालुक्यात आणि कोलाडमध्ये घडलेल्या बलात्कार घटनेतील संकेत शिगवण आणि शंकर पवार ह्या कैद्यांना अलिबाग शहरातील आंग्रेकालीन जेलमध्ये ठेवण्यात आले होते. जेलची भिंत ही 30 ते 40 फूट उंचीची दगडी बांधकामाची आहे. शुक्रवार (ता. 22) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कारागृहात धान्य आले होते. त्यावेळी कारागृह पोलिस धान्य घेण्याच्या कामात असताना या दोन कैद्यांनी पोलिसांची नजर चुकवून भिंतीवरून खाली उडी मारून पलायन करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात अलिबाग गुन्ह्यातील अटक आरोपी शंकर पवार यास पकडण्यात यश आले आहे. तर कोलाड गुन्ह्यातील शिगवण आरोपी हा फरार आहे.

मोठी बातमी : लॉकडाऊन 4.0: मुंबईत आजपासून काय सुरु होणार?

फरार झालेल्या कैद्याला पकडण्यासाठी शहरातील सर्व सीमेवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या फरार कैद्याचा तपास अलिबाग पोलिस करीत आहेत.

Prisoner escapes from district jail - a possession; Blockade in Alibag


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prisoner escapes from district jail - a possession; Blockade in Alibag