मोदींनी अमेरिकेसमोर लोटांगण घातलं; पृथ्वीराज चव्हाणांनी सोडलं टीकास्त्र

मोदींनी अमेरिकेसमोर लोटांगण घातलं; पृथ्वीराज चव्हाणांनी सोडलं टीकास्त्र

मुंबई : संपूर्ण जगात कोरोनानं मानवी जीवन विस्कळीत झालंय झालंय. त्यात कोरोनावर अजूनही औषध सापडलं नाहीये. अशात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या गोळीची मागणी अमेरिकेकडून भारताला करण्यात आली होती. मोदींनी ही मागणी मान्यही केली. मात्र आता यावरून कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर बोचरी टीका केली आहे. मलेरिआवर काम करणारी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन ही गोळी सध्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार म्हणून वापरली जातेय. ही गोळी घेतल्यामुळे रुग्णांना तात्पुरतं बरं वाटतंय. म्हणूनच अमेरिकेनं भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची मागणी केली होती. 

भारतानं आम्हाला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध दिलं नाही तर आमच्याकडूनही कुठलीही मदतीची अपेक्षा ठेऊ नये असं अमेरिकेनं म्हंटल होतं. यालाच घाबरून मोदींनी अमेरिकेला आणि इतर देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन दिलं आणि अमेरिकेसमोर लोटांगण घातलं अशी बोचरी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटलंय.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण:

"भारतानं देशांतर्गत औषधाची गरज भागवण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र अमेरिकेनं धमकी दिल्यानंतर लगेच मोदींनी ही बंदी उठवली आणि अमेरिकेबरोबर इतर देशांनाही याची निर्यात सुरु केली. हे मात्र चुकीचं झालं. देशाची परिस्थिती सुधरवण्यासाठी केंद्र सरकारच्या केवळ १५ हजार कोटींनी काही होणार नाही, सरकारनं २१ लाख कोटी दिले पाहिजेत.  कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे डबघाईला आले आहेत त्यामुळे सरकारनं शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी शेतीमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत"असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटलय.

दरम्यान मोदींनी ट्रंम्प यांच्या धमकीसमोर लोटांगणच घातलं आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा करण्यासाठी तयार झाले असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटलंय.

Prithviraj Chavan targets PM narendra Modi over giving hydroxychloroquine tablets to United states

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com