... म्हणून खासगी रुग्णालयांना आहे कोरोनाचा धोका!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 एप्रिल 2020

मोठ्या खासगी रुग्णालयांमध्येही कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. वोक्‍हार्ट रुग्णालयातील आणखी 26 व जसलोकमध्ये आणखी 24 परिचारिकांना कोरोनाची लागण झाली असून, बॉम्बे हॉस्पिटलमधील आणखी 10 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

मुंबई : मोठ्या खासगी रुग्णालयांमध्येही कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. वोक्‍हार्ट रुग्णालयातील आणखी 26 व जसलोकमध्ये आणखी 24 परिचारिकांना कोरोनाची लागण झाली असून, बॉम्बे हॉस्पिटलमधील आणखी 10 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

ही बातमी वाचली का? लॉकडाऊन वाढले... अन्‌ त्यांच्या रोजीरोटीवरच आली गदा! हंगाम हातचा गेला...

कोरोनाचा संसर्ग मुंबईत झपाट्याने वाढत आहे. चाळी, गावठाणे, झोपडपट्ट्यांतही प्रादुर्भाव होत आहे. दिवस-रात्र रुग्णांची सेवा करणारे डॉक्‍टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची सर्वाधिक संख्या वोक्‍हार्ट रुग्णालयात असून, आतापर्यंत एकूण 75 जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. जसलोक रुग्णालयातील 24 परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यांना कुलाबा येथील कर्मचारी निवासात क्वारंटाईन करण्यात आले होते. ही मुदत संपल्यानंतर कामावर रुजू होण्यापूर्वी केलेल्या त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जसलोकमधील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या 50 वर गेली आहे. बॉम्बे हॉस्पिटलमधील 12 हून अधिक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 

ही बातमी वाचली का? 'जनतेचं काहीही होऊ द्या, पण मी पुन्हा येईन'!- जयंत पाटील यांचे विरोधकांवर टीकास्त्र

फॉल्स निगेटिव्ह केसेस 
काही दिवसांपूर्वी जसलोक आणि वोक्‍हार्ट रुग्णालयांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची पहिली चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. हा कालावधी संपल्यानंतर दुसरी चाचणी मात्र पॉझिटिव्ह आली. अशा प्रकरणांना फॉल्स निगेटिव्ह केसेस असे म्हणतात. 

ही बातमी वाचली का? 'मुळशी पॅटर्न'च्या हिंदी रिमेकमध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत... 

... म्हणून निगेटिव्ह 
अतिजोखमीच्या (हाय रिस्क) व्यक्तींच्या तात्काळ चाचण्या केल्यास काही जणांचे अहवाल निगेटिव्ह येतात. काही दिवसांनंतर विषाणू सक्रिय झाल्यानंतर मात्र चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह येतात, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private hospitals are at risk of coronas!