
नवी मुंबई : खासगी रुग्णालयांनी १५ प्रकारच्या सेवांबाबत दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक असताना पनवेलमध्ये या नियमांना बगल दिली जात आहे. शहरातील बहुतांश सर्वच रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावण्यास टाळाटाळ केली जात आहे. विशेष म्हणजे रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर बिलाची रक्कम वसूल करण्यासाठी मृतदेह अडवून ठेवण्यापर्यंत रुग्णालयांमध्ये घटना घडत आहेत. अशा घटनांबाबत प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा देताच पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई करण्याच्या नोटिसा संबंधित रुग्णालयांना बजावल्या आहेत.