घरातच कोरोनावर उपचार घेणाऱ्यांसाठी आता आलेत पॅकेजेस, जाणून घ्या काय काय आहे त्यात..

essentials
essentials

मुंबई: राज्यात कोरोना बाधितांचा आकडा तब्बल एक लाखच्या पुढे गेला आहे. त्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत चालली आहे. यातल्या रुग्णालयांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांना बेड्स देखील उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आयसीएमआरनं काही दिवसांपूर्वी सौम्य लक्षणं असलेल्या किंवा लक्षणं नसलेल्या रुग्णांना घरातच राहता येईल असे निर्देश दिले होते. मात्र घरातल्या सदस्यांनी त्यांची काळजी घ्यावी असंही ICMR ने स्प्ष्टपणे सांगितलं होतं. याची अंमलबजावणी सर्व पालिकांनी सुरु केली आहे. म्हणुनच सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी किंवा लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी आता खासगी रुग्णालयांनी आणि काही कंपन्यांनी स्पेशल पॅकेज उपलब्ध करून दिले आहेत. 

ICMR नं सांगितल्याप्रमाणे या रुग्णांनी १५ दिवस स्वतःच्या घरातच अलगीकरणात राहायचं आहे. मात्र अशा रुग्णांपासून त्यांच्या घरच्या सदस्यांनाही संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे काही खासगी रुग्णालयांनी आणि कंपन्यांनी अशा रुग्णांना स्पेशल पॅकेज उपलब्ध करून दिले आहेत. यात १५ दिवस फोनवरून वैद्यकीय सेवा, निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटायझर, ग्लोव्हज् आणि पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी कोरोनासंदर्भात तपासणी अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. तसंच कोरोनाग्रस्त रुग्णाला अधिक त्रास झाल्यास त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. 

सध्या खासगी रुग्णालयं आणि कंपन्या अशा प्रकारच्या पॅकेजसंदर्भात सोशल मीडियावरून माहिती पोहोचवत आहेत. या पॅकेजची किंमत ४०० रुपये प्रति दिवस ते ४ हजार रुपये प्रति दिवस इतकी आहे असं सांगण्यात आलंय. मात्र यात सॅनेटाईझर आणि मास्क कुठल्या कंपनीचे राहतील याबद्दल माहिती देण्यात आली नाहीये. विशेष म्हणजे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही सेवा विनाशुल्क उपलब्ध करून दिली जात आहे.

कुटुंबातल्या सदस्यांचीही होणार तपासणी: 

अशा प्रकारच्या पॅकेजमध्ये रुग्णांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांचीही तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनाही संसर्ग होण्याची भीती आहे त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांचीही तपासणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे या पॅकेजमध्ये रुग्णांच्या कुटुंबीयांनीही तपासणी होणार आहे. 

दरम्यान, अशा प्रकारचं पॅकेज घेताना रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सावधगिरी बाळगावी. तसंच वैद्यकीय निकषांचं पालन करूनच हे पॅकेज घ्यावं असा सल्ला काही तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे आता अशा प्रकारचे पॅकेज घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांना किती फायदेशीर ठरतात हेच बघणं महत्वाचं असणार आहे.  

private hospitals in mumbai now giving special package to home quarantine patients 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com