कोरोनाच्या संवेदनशील परिस्थिती प्राध्यापक संजय पाटे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथील ऊस तोड कामगार आणि मोल मजुरी करणारे वाल्मीक ओंकार चव्हाण यांचे नुकतेच काही दिवसापूर्वी निधन झाले. त्यांचे भाऊ भाऊराव ओंकार चव्हाण हे सुध्दा अपंग आहेत. अशातच या कोरोनाग्रस्त वातावरणात हाताला काम नाही. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही कुटुंबाना महिनाभराचा किराणा प्राध्यापक संजय एकनाथ पाटे यांच्याकडून देण्यात आला.

सध्या जगभरात कोरोनाची धास्ती आहे. दिवसागणिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाच एकदा वाढताना पाहायला मिळतोय. अशात सरकारकडून संसर्ग रोखण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्नकरतेय . लॉकडाऊनचा वेळ सुरु आहे. अनेकांचे रोजगार बंद आहेत. अनेकांचा पगार कापला जाणार आहे. अशात सरकारकडून सर्व गरजू नागरिकांना मदत करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय.

कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत, कठीण परिस्थितीत चाळीसगावच्या प्राध्यापक संजय पाटे आणि रांजणगाव चे सरपंच शेखर निंबाळकर यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय.   

मोठी बातमी - मुंबईत एकाच हॉस्पिटलमधील २६ नर्स आणि ३ डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालय परिसर केला सिल  

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथील ऊस तोड कामगार आणि मोल मजुरी करणारे वाल्मीक ओंकार चव्हाण यांचे नुकतेच काही दिवसापूर्वी निधन झाले. त्यांचे भाऊ भाऊराव ओंकार चव्हाण हे सुध्दा अपंग आहेत. अशातच या कोरोनाग्रस्त वातावरणात हाताला काम नाही. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही कुटुंबाना महिनाभराचा किराणा प्राध्यापक संजय एकनाथ पाटे यांच्याकडून देण्यात आला.

त्यावेळी गावाचे सरपंच संजय जाधव, पोलिस पाटील राजेंद्र महादू परदेशी, रांजणगावच्या सरपंच शेखरभाऊ निंबाळकर हे देखील उपस्थित होते. यावेळी या दोन्ही मुलांना १० वी पर्यंत शिक्षणासाठी लागणारे साहित्य व कपडे गणवेश याची जबाबदारी रांजणगावचे सरपंच शेखर निंबाळकर यांनी घेतली. 

professor sanjay pate helped poor family of chalisaon during corona virus crisis

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: professor sanjay pate helped poor family of chalisaon during corona virus crisis