Mumbai News : प्रतिबंधित ई सिगरेटचा साठा जप्त; फिल्मी स्टाईलने पाठलाग करत आरोपी अटकेत

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत सुमारे 66 लाख रुपये किमतीच्या ई-सिगारेटचा साठा जप्त
prohibited e-cigarette stocks seized Accused arrested mumbai police
prohibited e-cigarette stocks seized Accused arrested mumbai policesakal

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत सुमारे 66 लाख रुपये किमतीच्या ई-सिगारेटचा साठा जप्त करत फिल्मी स्टाईलने आरोपीचा पाठलाग करून अटक केली आहे. ई-सिगारेटची ही जप्ती अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई आहे.

prohibited e-cigarette stocks seized Accused arrested mumbai police
Mumbai Crime News : शेअर ट्रेडिंग कंपनीला गंडा घालणाऱ्या सराईत भामट्याला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 4 मार्च रोजी रात्री पोलीस अधिकारी दक्षिण मुंबईतील मसजित परिसरात तपासणी करत असताना त्यांना एक एसयूव्ही गाडी संशयास्पद आढळली. संशयावरून, अधिकाऱ्यांनी त्याला तपासणीसाठी गाडी थांबवण्यास सांगितले परंतु गाडी थांबवण्याऐवजी संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

अधिकार्‍यांनी त्याच्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि काही वेळाने कार थांबवली. अधिकार्‍यांनी गाडीची तपासणी केली तेव्हा त्यांना कारमध्ये अनेक बॉक्स आढळले. बॉक्स उघडल्यावर त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित ई-सिगारेट सापडल्या.

prohibited e-cigarette stocks seized Accused arrested mumbai police
Mumbai News : कोपर खाडीत बेकायदा रेती उपसा ग्रामस्थांनी केला उघड

संशयिताला तात्काळ ताब्यात घेऊन मालाची चौकशी करण्यात आली. त्याला डोंगरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले जेथे त्याच्याविरुद्ध ई-सिगारेट प्रतिबंध कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.

पुढील कायदेशीर कारवाईसाठी संशयिताला डोंगरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी शहरात बंदी घातलेल्या ई-सिगारेटच्या विक्रीवर मोठी कारवाई सुरू केली आहे. ई-सिगारेटच्या विक्री संदर्भात शहर पोलीस, गुन्हे शाखा आणि इतर युनिट मुंबईत छापे टाकत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com