प्रकल्पग्रस्तांचा मंदा म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा

प्रकल्पग्रस्तांचा मंदा म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा
प्रकल्पग्रस्तांचा मंदा म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा

नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीने जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने म्हात्रे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या प्रसंगी सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, उपाध्यक्ष वसंत म्हात्रे, कार्याध्यक्ष डॉ. राजेश पाटील, सचिव सुदाम पाटील, नामदेव डाऊरकर व इतर सदस्य उपस्थित होते.

यापूर्वी गुजराती, जैन, मारवाडी व नाभिक समाजांनी म्हात्रे यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. आपल्या पाच वर्षांच्या काळात आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या सर्व समस्यांचे निराकरण केले असल्याचे मत या वेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने व्यक्त केले. म्हात्रे यांनी प्रकल्पग्रस्तांचे हितसंबंध गेल्या पाच वर्षात जपलेले आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणाऱ्या  मंदा म्हात्रे या पहिल्या आमदार असल्याचे मत मनोहर पाटील यांनी व्यक्त केले. मंदा म्हात्रे यापूर्वीही आपल्या मागे उभा होत्या, आजही आहेत आणि भविष्यात येणाऱ्या कोणत्याही चांगल्या-वाईट प्रसंगात खंबीरपणे उभ्या राहणार असून येणाऱ्या २४ तारखेला होणाऱ्या विजयी जल्लोषाची आम्ही तयारी करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले. म्हात्रे या निवडून येणार यात शंकाच नाही; परंतु त्या भरघोस मतांनी निवडून याव्यात याकरिता एम.आय.डी. व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती, नवी मुंबई यांचा जाहीर पाठिंबा दर्शवीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार म्हात्रे यांनी आपल्या पाच वर्षांच्या काळात प्रकल्पग्रस्तांचे हितसंबंध जोपासत, सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले. त्यामुळे एमआयडीसी, सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीच्या शिष्टमंडळाचा त्यांना जाहीर 
पाठिंबा आहे.
-मनोहर पाटील, अध्यक्ष, सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com