मुंबईतील विलेपार्ले पोलिस ठाण्याला सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कार

मुंबईतील विलेपार्ले पोलिस ठाण्याला सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कार

मुंबईः विलेपार्ले पोलिस स्टेशनला मार्च महिन्यासाठी सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कार मिळाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह-आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी उकृष्ट कामगिरी करणा-या पोलिस आणि पोलिस ठाण्यांना पुरस्कार देण्यास सुरूवात केली आहे.

फेब्रुवारी महिन्यात विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीची एक घटना घडली होती. त्यात 21 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. घरात कोणीही नसताना चोरटे घराचे कुलुप तोडून आत शिरले आणि चोरी करून पसार झाले होते. चोरी एवढ्या हातसफाईने केली होती की, चोरीचा कुठलाही पुरावा त्यांनी सोडला नव्हता. विलेपार्ले परिसर हा शांत आणि सुसंस्कृत लोकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे चोरीच्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ घडलेल्या घटनेसंदर्भात गुन्हा नोंदवला. कुठला ही पुरावा नसताना सुद्धा अतिशय कसोशीने या चोरीच्या प्रकारणाचा तपास पोलिसांनी सुरु केला.

पोलिस उपायुक्त मंजूनाथ शिंगे यांच्या आदेशानुसार, विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अलका मांडवे याच्या नेतृत्वाखाली या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिस पथक तयार करण्यात आले. पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक नेमण्यात आले. तपास करत असताना गुप्त माहितदारांकडून छोटासा सुगावा पोलिसांना लागला. तोच धागा धरत साहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर डोईजड यांनी अतिशय सखोल निरिक्षण करून सर्व केंद्रबिंदू जोडले आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर डोईजड आपल्यासोबत पोलिस नाईक पडवळ, महाडेश्वर, पोलिस शिपाई कांबळे यांना घेऊन उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाले. तिथून विकास उर्फ राजा अनिल सिंह आणि अंगद कश्यप या आरोपींना अटक करत त्यांच्याकडून 18 लाख 17 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल आणि रक्कम जप्त केली.

कुठला ही सुगावा नसतानासुद्धा केलेल्या या तपासाबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक अलका मांडवे, पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर डोईजड, पोलिस नाईक पडवळ, महाडेश्वर नाईक पोलिस शिपाई कांबळे यांना रोख रक्कम 15 हजार आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

property seizure award got mumbai vile parle police station

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com