esakal | शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर...संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर...संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचं अध्यक्षपद दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या चर्चेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर...संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचं अध्यक्षपद दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या चर्चेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष झाले तर आम्हाला आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत दिली.युपीए अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास राहुल गांधी यांनी  नकार दिल्याने शरद पवार यांचं नाव पुढे असल्याची चर्चा आहे. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील असा दावाही केला जात आहे. त्यावर शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाल्यास काय भूमिका असेल यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार हे जर यूपीएचे अध्यक्ष झाले तर ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मात्र पवार यांनी स्पष्ट केले आहे की, या वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नाही. याबाबत अजून कोणता प्रस्ताव आला नसून त्याबाबत बोलणे चुकीचं असल्याचं संजय राऊत म्हणाले.

आम्ही तर नेहमीच हितचिंतक राहिलो आहोत. जर असा कोणता प्रस्ताव आला तर त्याचं समर्थन करु, असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे. 

अधिक वाचा-  जे.पी. नड्डा यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राम कदमांकडून निषेध, घाटकोपरमध्ये मोर्चा

नव्या राजकीय वातावरणात विरोधकांना एकत्र येऊन काही निर्णय घ्यावे लागतील.  काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विरोधीपक्षही मिळवता आले नाही, हेही सत्य आहे.  सध्या राजकारणाच्या परिस्थितीत सर्व विरोधी पक्षांना मजबुतीचे निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे विरोक्षी पक्षांनी एकत्र येऊन यूपीएला मजबूत केले पाहिजे. असं म्हणत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. देशात एक मजबूत फ्रंट हवा आहे, याच नेतृत्व कोण करणार ही एक मोठी गोष्ट आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी काहीजणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरली असल्याचं दिसत असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Shiv Sena leader Sanjay Raut reaction on Sharad pawar upa chairman