मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा - अमित देशमुख

संतोष भिंगार्डे
Saturday, 28 November 2020

मनोरंजन क्षेत्रामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला मदत होते. दरम्यान या क्षेत्रात वाढ होण्यास अजूनही  वाव बाकी आहे.

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची 43 वी सर्वसाधारण सभा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये अमित देशमुख यांनी राज्याच्या मनोरंजन क्षेत्राबाबत धोरण ठरवणे महत्त्वाचे असल्याचं म्हंटल आहे. 

महाराष्ट्रात केवळ हिंदी किंवा मराठी नव्हे तर विविध भाषांमधील चित्रपट, टीव्ही सिरियल्स, माहितीपट तसेच जाहिरातींची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. यामार्फत मनोरंजन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नागरिक कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहे. हे विचारात घेऊनच या क्षेत्रासाठी निश्चित धोरण तयार करावं आणि या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे आदेश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी  दिले. 

महत्त्वाची बातमी : "महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री आजवर पाहिले नव्हते"; सरकारवर फडणवीसांचा हल्लाबोल

मनोरंजन क्षेत्रामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला मदत होते. दरम्यान या क्षेत्रात वाढ होण्यास अजूनही  वाव बाकी आहे. म्हणूनच पुढील काळात चित्रपट निर्मात्यांना मुंबईबरोबरच राज्यातील इतर चित्रिकरण स्थळांकडे आर्कर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये चर्चिले गेलेल्या बाबींचाही मनोरंजन क्षेत्रासाठीचे सर्वंकष धोरण ठरविताना समावेश करण्यात यावा.

महत्त्वाची बातमी : ED आणि CBI वर निशाणा साधणारं संजय राऊतांचं ठाकरी पद्धतीचं विशेष व्यंगात्मक ट्विट

सोबतच महामंडळाने गेल्या 15 वर्षाची लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली असून अनेक सार्वजनिक उपक्रमांपैकी नफ्यात असलेल्या काही मोजक्या महामंडळापैकी चित्रनगरी हे एक महामंडळ आहे. यापुढील काळातदेखील ही परंपरा अशीच सुरु राहील. येणाऱ्या काळात महामंडळ केवळ आर्थिक पातळीवरच नाही तर धोरणात्मक पातळीवरही महत्वाची कामगिरी करेल असा विश्वास यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

( संपादन - सुमित बागुल )

proposal to give industry status to the entertainment sector should be submitted immediately


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: proposal to give industry status to the entertainment sector should be submitted immediately