ED आणि CBI वर निशाणा साधणारं संजय राऊतांचं ठाकरी पद्धतीचं विशेष व्यंगात्मक ट्विट

सुमित बागुल
Saturday, 28 November 2020

शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी आज एक व्यंगचित्र ट्विट करत CBI आणि ED वर निशाणा साधलाय.

मुंबई : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी आज एक व्यंगचित्र ट्विट करत CBI आणि ED वर ठाकरी पद्धतीत निशाणा साधलाय. संजय राऊत यांनी शेअर केल्येला ट्विटमध्ये दोन श्वान पाहायला मिळतायत. एका श्वानासमोर ED तर श्वानासमोर CBI असं लिहिण्यात आलंय. समोर महाराष्ट्राच्या दिशेने जाणारा बोर्ड देखील पाहायला मिळतोय. या व्यंगचित्रावरील कॅप्शनमध्ये "रुक ! अभी तै नहीं है किसके घर जाना हैं" असं लिहिलंय. दरम्यान यावर स्वतः संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलंय.   

महत्त्वाची बातमी : कसा होता निलकानंतरचा 'नोव्हेंबर २०१९' चा महिना, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा लहानसा रिकॅप

आपण व्यंगात्मक ट्विट केलं कारण, "मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत फार जवळून काम केलंय. व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे आमचे नेते आहेत. त्यामुळे हे व्यंग आहे, ज्याला समजलंय ते त्या पद्धतीने घेतील. ज्यांना नाही समजलं ते अधिक सूड भावनेनेने वागतील. आज महाराष्ट्र सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. जसं आपण मगाशी म्हणालात की, केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी पकडून, न्यायव्यवस्थेवर दबाव आणून सुडाचं राजकारण सुरु आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो. या गोष्टी तटस्थपणे पाहतो. ज्यांना या गोष्टीतून विकृत आनंद मिळतोय तर त्यांनी तो घ्यावा. मात्र महाराष्ट्राला एक परंपरा आहे, त्यामध्ये ते बसत नाही. अशा प्रकारची परंपरा देशाची नाही तर ही परंपरा इस्ट इंडिया कंपनीची होती. गुलाम बनवण्याच्या इस्ट इंडिया कंपनीच्या परंपरेला कुणी जागत असेल तर देशातील जनता, विशेषतः महाराष्ट्राची जनता फार जागरूक आहे.

महत्त्वाची बातमी : केंद्राने दाखल केली याचिका, कांजुरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात

संजय राऊत यांनी केलेलं ट्विट : 

   

विरोध करण्याचं विरोधीपक्षाचे काम आहे. त्यांनी विधायक विरोध करत राहिला पाहिजे. राज्यातील विरोधीपक्ष खूप शक्तिमान आहे हे मी नेहमी सांगतो. विरोधकांनी याचा वापर महाराष्ट्र घडवण्यासाठी, विधायक कामांसाठी करावा असे आम्हाला वाटते असेही संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणालेत. 

shivsena rajyasabha MP sanjay raut targets CBI and ED by sharing special cartoon


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena rajyasabha MP sanjay raut targets CBI and ED by sharing special cartoon